विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली/औरंगाबाद : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी स्वतःला लोकशाहीवादी म्हणवून घेतात. उदारमतवादी असल्याची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना थोडी जरी लोकलज्जा असेल आणि लोकशाहीची खरोखरच चाड असेल तर त्यांनी आणीबाणीतील अत्याचारांबाबत जनतेची माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकरांनी केलीय. त्यासाठी त्यांनी काँग्रेस सरकारांनी जनतेच्या केलेल्या मुस्कटदाबींचे अनेक दाखलेच आपल्या फेसबुक पोस्टवर दिले आहेत. नेहरूंवर टीका करणारया कवितेबद्दल गीतकार मजरूह सुलतानपुरींना केलेली अटक ते यूपीए सरकारने केलेली इंटरनेट सेन्साॅरशिपची वकिली अशी निवडक उदाहरणे त्यांनी दिलीत. BJP National secretary Vijaya Rahatkar demanded apology from Rahul Gandhi over atrocities in Emergency
शुक्रवारी, २५ जूनरोजी इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीला ४६ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त श्रीमती विजया रहाटकर यांनी विस्तृत पोस्ट फेसबुकवर टाकली आहे. त्यात त्यांनी लिहिलंय, “२५ जून १९७५ रोजी लादलेल्या आणीबाणीला आज ४६ वर्षे होत आहेत.
जनतेच्या अधिकारांवर गदा आणणारया, लोकशाहीला कलंकित करणारया काळ्याकुट्ट आणीबाणीतील अत्याचारांचे स्मरण करण्याचा हा दिवस. पण जनतेची मुस्कटदाबी फक्त आणीबाणीतच झाली, असे नव्हे. पं. नेहरूंपासूनच मुक्त स्वातंत्र्यावर, भाषण स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे अनेक ‘पराक्रम’ केले होते. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे स्वतःला लोकशाहीवादी म्हणवून घेतात. पण त्यांच्याच काँग्रेस सरकारांनी लोकशाहीवर कसे आघात केले होते, याची कल्पना त्यांना नसावी. म्हणून त्यांच्या माहितीसाठी काही निवडक उदाहरण देते आहे… थोडी जर लोकलज्जा असेल आणि लोकशाहीची खरोखरच चाड असेल तर त्यांनी आणीबाणीतील अत्याचारांबाबत जनतेची माफी मागावी.”
श्रीमती रहाटकर यांनी काँग्रेस सरकारांनी जनतेच्या स्वातंत्र्यावर गदा आणलेल्या काही घटनांची जंत्रीच दिली आहे. ती पुढीलप्रमाणे :
The #DarkDaysOfEmergency can never be forgotten. The period from 1975 to 1977 witnessed a systematic destruction of institutions. Let us pledge to do everything possible to strengthen India’s democratic spirit, and live up to the values enshrined in our Constitution. — Narendra Modi (@narendramodi) June 25, 2021
The #DarkDaysOfEmergency can never be forgotten. The period from 1975 to 1977 witnessed a systematic destruction of institutions.
Let us pledge to do everything possible to strengthen India’s democratic spirit, and live up to the values enshrined in our Constitution.
— Narendra Modi (@narendramodi) June 25, 2021
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App