प्रतिनिधी
मुंबई – दक्षिणेतील सुपरस्टार जयललिता यांची जबरदस्त भूमिका साकारल्यानंतर कंगना राणावत आता तडाखेबंद इंदिरा साकारण्याच्या तयारीला लागली असून तिनेच आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवरून ही माहिती दिली आहे. कंगना इमर्जन्सी अर्थात आणीबाणी या सिनेमात पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. इमर्जन्सी हा सिनेमा मणिकर्णिका फिल्म्स प्रोड्यूस करणार आहे. त्यासाठीची आवश्यक तयारीही चालू आहे. Kangana ranut to play Indira gandhi in “Emergency”
सध्या या सिनेमाची पूर्व तयारी सुरू आहे. पण पुढच्या वर्षी रिलीज होणाऱ्या मोठ्या सिनेमांमध्ये इमर्जन्सी या सिनेमाचा समावेश होत असल्याचे मानले जात आहे. इमर्जन्सी सिनेमा अर्थातच पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर बेतला आहे. यात इंदिराजींची भूमिका कंगना साकारतेय.
आज इन्स्टाग्रामवर तिने काही फोटो पोस्ट करून या भूमिकेची तयारी सुरू झाल्याची माहिती दिली. इंदिराजींच्या भूमिकेसाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्यावर काम सुरू असल्याचे कंगनाने म्हटले आहे. प्रत्येक व्यक्तिरेखा साकारणे ही एक सुखद सुरूवात असते. इमर्जन्सी सिनेमात इंदिराजींची भूमिका साकारण्यासाठी चेहरा आणि शरीर स्कॅन केले जात आहे. त्यांच्यासारखे दिसण्याची ही तयारी आहे. अनेक मोठे कलाकार हे व्हिजन पूर्ण करण्यासाठी काम करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App