विशेष प्रतिनिधी
जीनिव्हा – जगभरातील निर्वासितांची एकूण संख्या आता 8 कोटी 24 लाख इतकी झाली आहे. जर्मनीची लोकसंख्याही जवळपास इतकीच आहे. बळजबरीने स्थलांतर करावे लागलेल्या लोकांमध्ये सलग नवव्या वर्षी मोठी वाढ झाली आहे. Migration became more complex in whole world
गेल्या वर्षी जगाच्या एकूण लोकसंख्येच्या एक टक्का लोक निर्वासित झाले असून दहा वर्षांपूर्वी निर्वासित झालेल्यांच्या तुलनेत ही संख्या दुप्पट आहे. निर्वासितांपैकी ४२ टक्के जण १८ वर्षांच्या खालील आहेत. २०१८ ते २०२० या कालावधीत सुमारे १० लाख बालके निर्वासित म्हणूनच जन्माला आली.
विविध ठिकाणी सुरु असलेली युद्धे, हिंसाचार, अत्याचार आणि मानवाधिकारांचे उल्लंघन या कारणांमुळे गेल्या वर्षभरात जगभरात एकूण ३० लाख लोकांना निर्वासित व्हावे लागल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित उच्चायुक्तालयाने (यूएनएचसीआर) सांगितले आहे. कोरोना संसर्गस्थितीमुळे सर्वच देशांच्या सीमा बंद झाल्या असताना आणि प्रवासावर निर्बंध असतानाही इतक्या प्रचंड संख्येने लोकांनी स्थलांतर केले. गेल्या वर्षी झालेल्या स्थलांतरामागे हिंसाचार आणि देशांतर्गत संघर्ष या कारणांबरोबरच पर्यावरण बदलाच्या परिणामांमुळेही मोझांबिक, इथिओपिया आणि आफ्रिका खंडातील काही भागातील लोकांना स्थलांतर करावे लागले आहे. अशा लोकांची संख्या काही हजारांमध्ये आहे तर सीरिया आणि अफगाणिस्तानातील युद्धजन्यस्थितीमुळे निर्वासित झालेल्यांची संख्या लाखांमध्ये आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App