विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोल्हापूरात मराठा आंदोलन; मुंबईत दोनच दिवसांचे विधिमंडळ पावसाळी अधिवेशन; दिल्लीत शरद पवारांच्या घरी मोदींना पर्याय देण्यासाठी बैठक हा आजच्या महाराष्ट्रातल्या आणि देशाच्या राजकारणात घडत असलेल्या राजकीय घडामोडींचा सारांश आहे.A meeting of the National Executive Committee of our Nationalist Congress Party was held in New Delhi today.
राज्यातल्या ठाकरे – पवार सरकारला मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी राज्यसभेचे खासदार संभाजीराजे यांनी अनुकूल भूमिका घेऊन मराठा मूक आंदोलन स्थगित केले. पण खुद्द कोल्हापूरातूनच त्यांच्या निर्णयाला विरोध होऊन सकल मराठा समाज आज रस्त्यावर उतरला.
ठाकरे – पवार सरकार संभाजीराजे यांना फसवत आहे, असा आरोप करून सकल मराठा समाजाने कोल्हापूरात आंदोलनाची सुरूवात झाली आहे. यापुढे महाराष्ट्रात सगळीकडे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
मुंबईत ठाकरे – पवार सरकारने कोरोनाचे कारण देत विधिमंडळाचे अधिवेशन दोन दिवसांमध्येच गुंडाळण्याचा निर्णय घेतला. मराठा आरक्षण – ओबीसी आरक्षण रद्द झाल्यावर हे विषय तापले असताना सरकारला अडचणीत आणण्याचा तसेच अनिल परबांपासून अनेक मंत्र्यांना घेरण्याचा भाजपचा डाव होता.
पण ठाकरे – पवार सरकारने अधिवेशनच दोन दिवसांचे ठेवून आपल्यावरील भाजपचे राजकीय हल्ले रोखण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीसांनी या मुद्द्यावरून विधिमंडळातून सभात्याग करून बाहेर येऊन सरकारचे पुरते वाभाडे काढले.
A meeting of the National Executive Committee of our Nationalist Congress Party was held in New Delhi today. In this meeting, I had a detailed discussion with my committee members on our future policies, our role in the next Lok Sabha elections and current national issues. pic.twitter.com/tNiDPJK2Jg — Sharad Pawar (@PawarSpeaks) June 22, 2021
A meeting of the National Executive Committee of our Nationalist Congress Party was held in New Delhi today. In this meeting, I had a detailed discussion with my committee members on our future policies, our role in the next Lok Sabha elections and current national issues. pic.twitter.com/tNiDPJK2Jg
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 22, 2021
त्याचवेळी दिल्लीत महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवारांनी महाराष्ट्रातल्या प्रश्नांकडे लक्ष द्यायचे सोडून केंद्रातील मोदी सरकारविरोधात बैठक घेण्याचे योजले आहे. त्याला विचारवंत, पत्रकार हजेरी लावण्याची शक्यता आहे.
या बैठकीच्या नियोजनासाठी पवारांनी आपल्या ५ खासदारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घरी घेतली. त्याला प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे आदी उपस्थित होते.
याचा अर्थ महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून देशात पर्यायी नेतृत्व उभे करण्याचा पवारांचा प्रयत्न यातून दिसून येतो आहे. कोल्हापूरात मराठा आंदोलन; मुंबईत दोनच दिवसांचे विधिमंडळ पावसाळी अधिवेशन आणि दिल्लीत शरद पवारांच्या घरी मोदींना पर्याय देण्यासाठी बैठक हा आजच्या महाराष्ट्रातल्या आणि देशाच्या राजकारणात घडत असलेल्या राजकीय घडामोडींचा सारांश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App