Devendra Fadnavis : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सरनाईकांनी उद्धव ठाकरेंना भाजपसोबत जुळवून घेत युती करण्याची विनंती केली आहे. त्यांच्या या पत्रानंतर आता विविध प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. याविषयी माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, युती व्हावी अशी अनेकांची इच्छा असू शकते. पण आमचं मानणं आहे की, हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतोय. जनतेचे प्रश्न आम्ही मांडतोय. आम्ही सिंगल लार्जेस्ट पार्टी होतो, पण बहुमत नव्हतं. येत्या काळात आम्ही बहुमताने निवडून येऊ. फडणवीस पुढे म्हणाले की, भाजप स्वबळावरच लढतेय. कुणी कोणाला जोडे मारायचे, कुणी कुणाला हार घालायचे हे त्यांनी ठरवायचे आहे. कुणासोबत कुणी जायचं आता त्यांनी ठरवायचं आहे. आमची बांधिलकी जनतेशी आहे. जनतेच्या बांधिलकीतून आम्ही काम करत राहू. Watch Devendra Fadnavis Reaction On Shiv Sena BJP Alliance
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App