वृत्तसंस्था
जम्मू – भारतीय हवाई दलातील वैमानिक माव्या सुदान जम्मू – काश्मीरमधून आलेली पहिली महिला फायटर बनली आहे. माव्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरा तालुक्यातील लांबेरी गावाची मूळ रहिवासी आहे. Mawya Sudan becomes first woman fighter pilot in IAF from J-K’s Rajouri
भारतीय हवाई दलाच्या हैदराबादच्या दिंडीगलमधील एअरफोर्स अकादमीत शनिवारी पार पडलेल्या दीक्षांत समारंभात हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आर. के. सिंग भदौरिया यांच्या उपस्थितीत विविध कॅडेट्सना कमिशन प्रदान करण्यात आले. त्यामध्ये माव्या सुदान हिची भारतीय हवाई दलात फायटर पायलट म्हणून भरती करण्यात आली.
माव्याने भारतीय हवाई दलाच्या प्रशिक्षणानंतर फ्लाइंग ऑफिसर म्हणून कमिशन मिळविलेच होते. आता भारतीय हवाई दलात ती १२ वी महिला फायटर बनली आहे. जम्मू – काश्मीर राज्यातून आलेली ती पहिली महिला फायटर पायलट असेल.
माव्याचे वडील विनोद सुदान यांनी माव्याच्या दैदिप्यमान कामगिरीविषयी स्फूर्तिदायक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माव्या आत्तापर्यंत आमची कन्या होती. आता ती संपूर्ण देशाची कन्या झाली आहे, असे ते म्हणाले. माव्या सुदान हिची बहीण मान्यता सुदान वैष्णोदेवी देवस्थान ट्रस्टमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून काम करते. फायटर पायलट बनण्याचे स्वप्न माव्याने जिद्दीने पूर्ण केल्याचे तिने सांगितले.
Mawya Sudan becomes first woman fighter pilot in IAF from J-K's Rajouri Read @ANI Story | https://t.co/d16tYlOKrZ pic.twitter.com/5ktZgqJ67B — ANI Digital (@ani_digital) June 20, 2021
Mawya Sudan becomes first woman fighter pilot in IAF from J-K's Rajouri
Read @ANI Story | https://t.co/d16tYlOKrZ pic.twitter.com/5ktZgqJ67B
— ANI Digital (@ani_digital) June 20, 2021
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App