विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसपदी पोर्तुगालचे माजी पंतप्रधान अँटोनिओ गुटेरेस (वय ७२) यांची फेरनिवड झाली.Antinuae Gutrez will General secretary of UN
यूएन’मधील १५ देशांच्या सुरक्षा समितीच्या ८ जून रोजी झालेल्याु गोपनीय बैठकीत गुटेरेस यांना पुढील पाच वर्षे मुदतवाढ देण्याचे ठराव मांडण्याचे ठरले होते. ‘यूएन’चे नववे सरचिटणीस म्हणून गुटेरेस यांनी १ जानेवारी २०१७ रोजी सूत्रे हाती घेतली होती.
त्यांचा हा कार्यकाळ यंदा ३१ डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे. गुटेरेस यांचा दुसरा कार्यकाळ १ जानेवारी २०२२ पासून सुरुवात होणार आहे. ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत ते या पदावर असतील. गुटेरेस यांच्या फेरनियुक्तीला भारतानेही पाठिंबा दिला होता.
कोरोनाच्या जागतिक साथीतही सर्वांच्या चांगल्या भवितव्यासाठी काम करेन, अशी ग्वाही अँटोनिओ गुटेरेस यांनी यांनी ‘यूएन’च्या सरचिटणपदी फेरनिवड झाल्यानंतर दिली. हा स्मरणीय क्षण असून तुम्ही माझ्यावर दाखविलेल्या विश्वायसाबद्दल मी खूप आभारी व ऋणी आहे. ‘यूएन’ची सेवा करणे हा माझा सन्मान आहे, असे त्यांनी शपथ समारंभानंतर सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App