Shivsena 55th Anniversary : राज्यातील सत्ताधारी पक्ष शिवसेनेचा आज 55वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज तमाम शिवसैनिकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. यादरम्यान शिवसेनेचे अनेक महत्त्वाचे नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख तसेच इतर पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. कोरोना महामारीची लाट अद्यापही पूर्णपणे ओसरलेली नाही, या पार्श्वभूमीवर या वर्षीही शिवसेनेचा वर्धापन दिन साधेपणाने आणि सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जाणार आहे. Shivsena 55th anniversary today uddhav thackeray Addressing To Party Workers By VC
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील सत्ताधारी पक्ष शिवसेनेचा आज 55वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज तमाम शिवसैनिकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. यादरम्यान शिवसेनेचे अनेक महत्त्वाचे नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख तसेच इतर पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. कोरोना महामारीची लाट अद्यापही पूर्णपणे ओसरलेली नाही, या पार्श्वभूमीवर या वर्षीही शिवसेनेचा वर्धापन दिन साधेपणाने आणि सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जाणार आहे.
शिवसेनेचा वर्धापन नेहमी मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने शिवसैनिक यासाठी येत असतात. परंतु, कोरोना महामारीमुळे सलग दुसऱ्या वर्षी गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाही सलग दुसऱ्या वर्षी शिवसेनेचा वर्धापन दिनाचा सोहळा साधेपणाने आणि सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जाणार आहे.
आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर शिवसेनेचा हा दुसरा वर्धापन दिन आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आज काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष आहे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने ठिकठिकाणी आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे तसेच इतर सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत.
Shivsena 55th anniversary today uddhav thackeray Addressing To Party Workers By VC
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App