क्रिस्टियानो रोनाल्डोच्या (Cristiano Ronaldo) एका कृतीमुळे कोका कोलाला (Coca Cola) कोट्यवधींच्या नुकसानाचा सामना करावा लागत आहे. थोडेथोडके नव्हे तर 4 बिलियन डॉलर्सचा तोटा झाला आहे. (Photo: Reuters)
जगप्रसिद्ध फुटबॉलपटू आणि पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने पत्रकार परिषदेदरम्यान कोका कोला या कोल्ड्रिंकच्या बाटल्या बाजूला केल्याने सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : क्रिस्टियानो रोनाल्डोच्या एका कृतीमुळे कोका कोलाला कोट्यवधींच्या नुकसानाचा सामना करावा लागत आहे. थोडेथोडके नव्हे तर 4 बिलियन डॉलर्सचा तोटा झाला आहे. भारतीय रुपयामध्ये ही किंमत 29000 कोटींपेक्षा जास्त आहे. फुटबॉल विश्वात रोनाल्डोचं नाव अतिशय आदरानं घेतलं जातं, दरम्यान रोनाल्डोने आता कोका कोलाला मोठा झटका दिला आहे. यूरो कप 2020 (UEFA Euro 2020) टूर्नामेंटवेळी झालेल्या प्रेस कॉन्फरन्स दरम्यान ही घटना घडली . रोनाल्डोने कोणता करार तोडला नाही किंवा त्याने कंपनीला धोका दिला नाही. रोनाल्डोने केवळ कोका कोलाच्या दोन बॉटल्स डेस्कवरून बाजूला सारत केवळ पाणी पिण्याचा सल्ला दिला. सॉफ्ट ड्रिंक न पिण्याच्या त्याच्या सल्ल्याने कोका कोलाच्या शेअर्समध्ये हंगामा झाला आहे.Cristiano Ronaldo VS Coca Cola: Ronaldo’s ‘free kick’ cost Coca-Cola dearly; company loses Rs 30,000 crore
👀 @Cristiano moving the sugary/unhealthy drinks and instead telling people to drink water… #Euro2020 pic.twitter.com/gcfssmmJ0r — Sam Quek (@SamanthaQuek) June 14, 2021
👀 @Cristiano moving the sugary/unhealthy drinks and instead telling people to drink water… #Euro2020 pic.twitter.com/gcfssmmJ0r
— Sam Quek (@SamanthaQuek) June 14, 2021
युरो कप 2022 स्पर्धेनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेसाठी रोनाल्डो दाखल झाला. रोनाल्डो जिथे बसून बोलणार होता तिथे कोका-कोलाच्या दोन बाटल्या ठेवण्यात आल्या होत्या.
कोका कोला युरो चषक स्पर्धेचं प्रायोजक असल्याने मंचावर कंपनीचं उत्पादन ठेवण्यात आलं होतं. रोनाल्डोने बोलता बोलता कोका कोलाच्या दोन्ही बाटल्या बाजूला केल्या. तिथे असलेली पाण्याची बाटली उचलून पाणी असं म्हटलं. एकप्रकारे कोल्ड्रिंक पिण्याऐवजी रोनाल्डाने पाणी पिण्यासाठी चाहत्यांना नकळतपणे प्रोत्साहन दिलं.
यूरो कप 2020 स्पर्धेत ‘ग्रुप ऑफ डेथ’ अशी ओळख असलेल्या ‘एफ’ गटात हंगेरीविरोधात होणाऱ्या सामन्याआधी रोनाल्डो पत्रकार परिषदेसाठी आला होता. रोनाल्डोच्या या कृतीनंतर कोका कोला कंपनीचे शेअर्स 1.6 टक्क्यांनी खाली घसरले आहेत. कोका कोला कंपनीला 4 बिलिअन डॉलर्सचं ( अंदाजे 29,990 कोटी रुपये) नुकसान सहन करावं लागलं आहे, असं तज्ज्ञांचं निरीक्षण आहे.
रोनाल्डोच्या या कृतीनंतर ट्विटरवर कोका कोला, कोका कोला रोनाल्डो हे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले. अनेकांनी रोनाल्डोच्या या बिनधास्त कृतीचं कौतुक केलं. पैशाच्या दबावाखाली न येता निर्भयपणे कोल्ड्रिंकला बाजूला सारण्याचे धाडस दाखवल्याबद्दल अनेकांनी रोनाल्डोची पाठ थोपटली. मात्र त्याचवेळी काहींनी रोनाल्डोच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
कोका कोला कंपनी ही युरो चषक स्पर्धेची प्रायोजक कंपनी आहे. कोणत्याही खेळासाठी, खेळाडूंसाठी, स्पर्धेसाठी प्रायोजक महत्त्वाचे असतात. प्रायोजकांमुळेच स्पर्धा होऊ शकते. अशा वेळी प्रायोजक कंपनीच्या उत्पादनाला बाजूला सारणं कितपत योग्य आहे असा सवाल काहींनी केला आहे.
सर्वकालीन महान खेळाडूंमध्ये रोनाल्डोची गणना होते. स्वत:च्या फिटनेसबाबत अतिशय जागरुक असणारा रोनाल्डो कोल्ड्रिंकपासून कटाक्षाने दूर असतो.
रोनाल्डोने केवळ कोका कोलाला झटका दिला असे नाही तर, पाचवा यूरो कप खेळणाऱ्या या दिग्गज खेळाडूने मॅचच्या 87 व्या आणि 90व्या मिनिटांना दोन गोल करत त्याच्या टीमला 3-0 असा विजय मिळवून दिला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App