वृत्तसंस्था
कोलकाता – प्रख्यात अभिनेते आणि भाजपचे नेते मिथून चक्रवर्ती यांची कोलकाता पोलीसांनी चौकशी केली आहे. पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणूकीच्या प्रचारात प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल ही चौकशी करण्यात आली. Actor & BJP leader Mithun Chakraborty is being questioned virtually by Kolkata Police over his controversial speech during election campaigning for West Bengal polls
माणिकतालामध्ये प्रचारसभेत मिथून चक्रवर्ती यांनी प्रचाराचे भाषण केले होते. त्याबद्दल त्यांच्या विरोधात कोलकाता पोलीसांनी एफआयआर दाखल केला होता. आता त्यांनी त्या एफआयआरच्या आधारे चौकशी केली आहे. मिथून चक्रवर्तींना पोलीस ठाण्यात बोलवून चौकशी करण्यात आली नाही, तर त्यांची व्हर्च्युअल चौकशी करण्यात आल्याचे पोलीसांनी सांगितले.
मी साधा नाग नाही. कोब्रा आहे. मी डसलो, तर कोणी पाणी मागणार नाही, असे उद्गार मिथून चक्रवर्ती यांनी त्या भाषणात काढले होते. त्यावेळी त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यावेळी निवडणूक आयोगाने त्यांना समज दिली होती. पण आज मिथूनदांच्या वाढदिवशी त्यांची कोलकाता पोलीसांनी व्हर्च्युअल चौकशी करून त्यांचा जबाब नोंदवून घेतला.
मिथूनदा भाजपचे स्टार प्रचारक होते. त्यांनी बंगाल विधानसभेच्या निवडणूकीच्या प्रचारात जान आणली होती. पण प्रचार संपल्यानंतर ते कोठेही भाजपच्या कार्यक्रमांमध्ये दिसले नाहीत. आज त्यांची पोलीसांनी चौकशी केल्याचीच बातमी आली.
Actor & BJP leader Mithun Chakraborty is being questioned virtually by Kolkata Police over his controversial speech during election campaigning for West Bengal polls. An FIR was registered in Maniktala for his speech. (File photo) pic.twitter.com/SY9eQyXkTz — ANI (@ANI) June 16, 2021
Actor & BJP leader Mithun Chakraborty is being questioned virtually by Kolkata Police over his controversial speech during election campaigning for West Bengal polls. An FIR was registered in Maniktala for his speech.
(File photo) pic.twitter.com/SY9eQyXkTz
— ANI (@ANI) June 16, 2021
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App