वृत्तसंस्था
नवी दिल्ली: बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षीत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामना (WTC final) 18 जूनला सुरु होणार आहे. न्यूझीलंडसोबत खेळवल्या जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपसाठी भारतीय संघाने आज 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ज्यात युवा शुबमन गिलला रोहित शर्मासोबत सलामीला येण्याची संधी मिळणार आहे. याव्यतिरीक्त भारतीय संघात रविचंद्रन आश्विन आणि रविंद्र जाडेजा या दोन्ही अनुभवी खेळाडूंना स्थान मिळालं आहे.TEAM INDIA WTC FINAL: Indian team announcement; Young Shubman Gill with Rohit has a chance to open; 12 crore to the winner
🗒️ #TeamIndia announce their 15-member squad for the #WTC21 Final 💪 👇 pic.twitter.com/ts9fK3j89t — BCCI (@BCCI) June 15, 2021
🗒️ #TeamIndia announce their 15-member squad for the #WTC21 Final 💪 👇 pic.twitter.com/ts9fK3j89t
— BCCI (@BCCI) June 15, 2021
असा असेल भारताचा 15 सदस्यीय संघ –
रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे (व्हाईस कॅप्टन), हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकिपर), वृद्धीमान साहा (विकेटकिपर), रविचंद्रन आश्विन, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज
दरम्यान, आयसीसीने या स्पर्धेसाठी बक्षीसाची रक्कम जाहीर केली असून विजेत्या संघाला 12 कोटींच्या घरात रक्कम आणि मानाची गदा मिळणार आहे. ICC ने याबद्दल अधिकृत पत्रक काढून माहिती दिली. पराभूत संघाला आयसीसीकडून 5 कोटींच्या घरात रक्कम मिळणार असून तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या संघाला 3 कोटींच्या घरात रक्कम बक्षीस म्हणून मिळणार आहे. चौथ्या क्रमांकावर आलेल्या संघाला 2 कोटी तर उर्वरित संघांना आयसीसी 73 लाखांच्या घरात बक्षीस देणार आहे.
शुभमन गिलला सलामीला खेळण्याची संधी
शुभमन गिल याची भारतातील इंग्लड विरोधातील कामगिरी समाधानकारक राहिली नव्हती त्यामुळे त्याचा टीम इंडियामध्ये समावेश होईल की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर मयंक अग्रवालला संधी मिळेल, अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, शुभमन गिल याचा समावेश करण्यात आला आहे
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App