विशेष प्रतिनिधी
नाशिक : फळशेतीची प्रयोगशाळा म्हणून बागलाणची जगभरात ओळख आहे. बागलाणमधील अर्ली द्राक्षे, डाळिंब, ड्रॅगन फ्रूट, केळी, सीताफळ, टोमॅटो, रंगीत ढोबळी मिरची, कांदा आदी फळे व भाजीपाल्याने जागतिक बाजारपेठेत आपला दबदबा कायम ठेवला आहे. येथील प्रयोगशील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या शेतीत निरनिराळे प्रयोग करून विविध प्रकारचे फळे, भाज्या पिकविण्यासाठी प्रयत्नशील असतात. आखतवाडे येथील युवा शेतकरी चंद्रकांत ह्याळीज यांनी आपल्या शेतात सफरचंदाची यशस्वी लागवड करून कृषी क्षेत्रात आदर्श निर्माण केला आहे
सटाणा तालूक्यातील आखातवाडे येथील तरुण शेतकरी चंद्रकांत ह्याळीज याने आपल्या शेतात प्रायोगिक तत्वावर केलेल्या शेतात सफरचंदाच्या शेतीचा प्रयोग यशस्वी करुन दाखवला आहे.
नाशिक जिल्हयाच्या सटाणा तालुक्यात अनेक शेतकरी मुख्य पीक म्हणजे डाळींब,अर्ली द्राक्ष आणि कांद्याच उत्पादन घेत असतात.
आखातवाडे येथिल तरुण शेतकरी चंद्रकांत ह्याळीज याने आपल्या वडिलोपार्जित पाच एकर क्षेत्रापैकी एक गुंठ्यात सफरचंद रोपांची तीन वर्षांपूर्वी हरीमन 99 जातीच्या रोपांची लागवड केली.चंद्रकांत ह्याळीज याने डाळींब रोप हिमाचलमध्ये पाठविल्यानंतर तेथिल काही लोकांनी ४५ डिंग्री तापमानात सफरचंद येऊ शकतात अशी माहिती दिल्यानंतर त्याने सुरवातील ३० रोप मागविली आणि त्याची लागवड केली. त्यानंतर त्यातील सात-आठ रोप खराब झाली मात्र बाकी सत्तावीस रोप जगली आणि आजच्या स्थितीला त्याला सफरचंद लागली.
योग्य व्यवस्थापन आणि नियोजन केल्याने अवघ्या 23 झाडांपैकी यंदा एका झाडाला 150 पेक्षा जास्त सफरचंद लागली आहेत.
विशेष म्हणजे 30 किलो सफरचंद 150 रुपये किलोने विक्री सुध्दा झाली आणि त्यातून चार हजार रुपयांच उत्पन्न त्यांना मिळाले.
डाळींबाच्या शेतीला मोठा खर्च औषध फवारणीसाठी होतो मात्र सफरचंदाच्या शेतीला कमी खर्च लागत असल्याने येत्या काही दिवसात एक एकर क्षेत्रात सफरचंदाच्या रोपांची लागवड ह्याळीज यांनी करण्याचा निर्णय घेतला आहे.
एकूणच द्राक्ष आणि डाळींबा सोबतच हिमाचल प्रदेशातील वातावरणात उत्पादीत होणारी सफरचंद नाशिक जिल्हयात यशस्वी पणे उत्पादीत होऊ शकतात हे चंद्रकांत ह्याळीज यांनी सिद्ध करुन दाखवले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App