कांदा कापायला घेतला की डोळ्यातून पाणी आले नाही असा माणूस भेटणार नाही. यातूनन अनेकदा विनोदही घडतात. पण कांदा कापताना डोळ्यातून पाणी येण्यामागे शास्त्र दडले आहे. पण कांदा कापताना अशाप्रकारे पाणी का येते याची अनेकदा आपल्याला माहिती नसते. खरे पाहता कांद्यात काही गंधकयुक्त संयुगे असतात, तशी काही एन्झाइमदेखील असतात. पण जोवर कांदा एकसंध असतो तोवर ही संयुगे आणि एन्झाइम्स परस्परांपासून अंतर ठेवून असतात. पण कांदा कापला गेला की त्या संयुगांचे रुपांतर अॅसिडमध्ये होते आणि एन्झाइम अॅसिडचे रुपांतर गंधकयुक्त ऑक्साईडमध्ये होते. Why cry when chopping onion
हे रसायन बाष्पनशील असते त्यामुळे त्याचे रुपांतर वायूत होऊन ते थेट डोळ्यात शिरते. तेथे त्याची प्रक्रिया डोळ्यातील अश्रुंमधील पाण्याशी होते आणि त्याचे रुपांतर सलफ्युरिक अॅसिडमध्ये होते. हे अॅसिड डोळे चुरचूरण्यास कारणीभूत असते. ही चुरचूर सुरु झाली की डोळ्यात आणखी अश्रूंची निर्मिती होऊ लागते. अर्थात कांदा चिरताना त्रास होवू द्यायचा नसेल तर त्यासाठी देखील काही शास्त्रीय उपाय आहेत. कांदा कापण्यापूर्वी २० ते २५ मिनिटे तो फ्रिजरमध्ये ठेवला तर त्याचा चुरचुरीतपणा कमी होतो. असा कांदा कापताना त्याचा वरचा पापुद्रा हळुवार काढून टाकावा, कांद्याचा वरचा भाग कापला तर चालतो पण पातीकडील भाग कापू नका म्हणजे सर्वात शेवटी कापा, कारण या भागातच तुम्हाला रडवणारा घटक सर्वात जास्त असतो. त्यामुळे वरचा भागा सर्वांत शेवटी कापावा. शक्य असेल तर वाहत्या पाण्याखाली काळजीपूर्वक कांदा कापला तरी त्याचा चुरचुरपणा कमी होतो. कारण पाण्यात त्यातील सलफ्युरिक अॅसिड धूवून जाते.
चांगली धार असलेला चाकू वापरा त्यामुळे हे जे काही त्याचा चुरचुरणारं रसायन आहे, त्याला फार डिस्टर्ब होत नाही. म्हणजेच त्याचे विघटन होत नाही. ते आपल्या जागेवरच राहतं आणि त्याचा चुरचुरपणा कमी होतो. कांदा कापल्यानंतर जर तो काही वेळानंतर वापरायचा असेल तर त्याला वाटीभर थंड पाण्यात टाकून ठेवा म्हणजे त्याचा वास किंवा चव बिघडणार नाही. जर घाई असेल कापलेल्या कांद्याचे तुकडे पाण्यात टाका. त्यामुळे कांदा कापताना डोळ्यात पाणी येणार नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App