shivshankar baba : चेन्नईजवळील केळंबक्कम येथे शैक्षणिक संस्था चालवणाऱ्या शिवशंकर बाबा या स्वघोषित आध्यात्मिक गुरूवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुशील हरी आंतरराष्ट्रीय शाळेत शिकणार्या काही विद्यार्थिनींनी बाबावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. हे आरोप सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आले आहेत. बळी पडलेल्यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे आणि त्यांच्यावरील शोषणाबद्दल सांगितले आहे. case filed against self style spiritual guru shivshankar baba in chennai
विशेष प्रतिनिधी
चेन्नई : चेन्नईजवळील केळंबक्कम येथे शैक्षणिक संस्था चालवणाऱ्या शिवशंकर बाबा या स्वघोषित आध्यात्मिक गुरूवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुशील हरी आंतरराष्ट्रीय शाळेत शिकणार्या काही विद्यार्थिनींनी बाबावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. हे आरोप सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आले आहेत. बळी पडलेल्यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे आणि त्यांच्यावरील शोषणाबद्दल सांगितले आहे.
या पीडितांच्या आरोपानंतर बाल कल्याण समितीने शिवशंकर बाबांना समन्स बजावले होते, परंतु ते हजर झाले नाहीत. शिवशंकर बाबांच्या चमूने सांगितले की, त्यांच्या छातीत दुखत आहे आणि त्यांना देहरादूनच्या रुग्णालयात दाखल केले आहे. तीन तक्रारदारांच्या तक्रारीच्या आधारे केळंबक्कमच्या महिला पोलिसांनी शिवशंकर बाबांवर गुन्हा दाखल केला आहे.
त्याच्याविरोधात भादंवि कलम 354, 363, 366 आणि पोक्सोच्या काही कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याने हे प्रकरण सीबीसीआयडीकडे वर्ग केले आहे. सीबीसीआयडी 13 पीडितांची चौकशी करणार आहे, त्यातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
case filed against self style spiritual guru shivshankar baba in chennai
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App