
GB Pant Hospital Malayalam Language Controversy : शनिवारी दिल्लीतील जीबी पंत रुग्णालयाने एक परिपत्रक काढून आपल्या नर्सिंग कर्मचाऱ्यांना कामावर असताना मल्याळम भाषेचा वापर करू नये, असे सांगितले. कारण स्पष्ट करताना ते म्हणाले की, बहुतेक रुग्ण आणि सहकाऱ्यांना ही भाषा माहिती नसते, त्यामुळे गैरसोय होत आहे. याबाबत काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि केरळचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी भाषेचा भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी ट्विट केले की, “इतर भारतीय भाषांप्रमाणेच मल्याळम ही भारतीय भाषा आहे. भाषेवरील भेदभाव थांबवा!” GB Pant Hospital Malayalam Language Controversy, Rahul Gandhi furious for ordering nurses not to speak Malayalam while on duty
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : शनिवारी दिल्लीतील जीबी पंत रुग्णालयाने एक परिपत्रक काढून आपल्या नर्सिंग कर्मचाऱ्यांना कामावर असताना मल्याळम भाषेचा वापर करू नये, असे सांगितले. कारण स्पष्ट करताना ते म्हणाले की, बहुतेक रुग्ण आणि सहकाऱ्यांना ही भाषा माहिती नसते, त्यामुळे गैरसोय होत आहे. याबाबत काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि केरळचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी भाषेचा भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी ट्विट केले की, “इतर भारतीय भाषांप्रमाणेच मल्याळम ही भारतीय भाषा आहे. भाषेवरील भेदभाव थांबवा!”
वास्तविक, दिल्लीतील अग्रगण्य रुग्णालयांपैकी एक असलेल्या गोविंद बल्लभ पंत इन्स्टिट्यूट ऑफ पोस्टग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्चने शनिवारी जारी केलेल्या परिपत्रकात परिचारिकांना संभाषण किंवा गंभीर कारवाईसाठी फक्त हिंदी आणि इंग्रजी वापरण्यास सांगितले होते. इतर अनेक कॉंग्रेस नेत्यांनीही या आदेशाचा निषेध केला आणि भाषेचा भेदभाव केल्याचा आरोप केला.
Malayalam is as Indian as any other Indian language.
Stop language discrimination! pic.twitter.com/SSBQiQyfFi
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 6, 2021
कॉंग्रेसचे खासदार केसी वेणुगोपाल यांनी ट्वीट केले की, “जीबी पंत अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या विचित्र आणि घटनाबाह्य परिपत्रक त्वरित मागे घेण्याचे आदेश आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना द्यावेत. ते म्हणाले की, हे परिपत्रक भेदभाव करणारे आहे आणि आमच्या राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांच्या विरोधात आहे.
GB Pant Hospital Malayalam Language Controversy, Rahul Gandhi furious for ordering nurses not to speak Malayalam while on duty
महत्त्वाच्या बातम्या
- HIV पॉझिटिव्ह महिलेला तब्बल 216 दिवस कोरोनाचा संसर्ग, शरीरात तयार झाले विषाणूचे खतरनाक 32 म्यूटेशन
- ममतांचा पराभव करणाऱ्या शुभेंदूंवर चोरीचा आळ, अधिकारी बंधूंविरोधात FIR, एक लाखाचे मदत साहित्य केंद्रीय सशस्त्र बलाचा वापर करून चोरल्याचा अजब आरोप
- बंगालमध्ये विरोधकांना मतदान केल्याची शिक्षा मिळत आहे, राज्यपाल धनखड यांचे ट्वीट
- दिल्लीच्या रुग्णालयात नर्सना ड्यूटीदरम्यान मल्याळम बोलणावर बंदी, तीव्र निषेधानंतर आदेश मागे
- Corona Updates : कोरोना संसर्गाच्या वेगाला ब्रेक, २ महिन्यांत सर्वात कमी १.१४ लाख नवीन रुग्ण, २४ तासांत २६७७ मृत्यू