
32 virus mutations : दक्षिण आफ्रिकेत शास्त्रज्ञांना HIVने ग्रस्त असलेल्या एका 36 वर्षीय महिलेमध्ये कोरोनाचे खतरनाक म्यूटेशन आढळले आहेत. महिलेच्या शरीरात कोरोनाचा विषाणू 216 दिवसांपासून आहे. यादरम्यान कोरोनाचे 32 प्रकारचे म्यूटेशन झाले आहेत. याप्रकरणाची रिपोर्ट मेडिकल जर्नल medRxiv मध्ये प्रीप्रिंट करण्यात आली आहे. विषाणूच्या एवढ्या म्यूटेशनचा शोध लागल्यानंतर शास्त्रज्ञ हैराण झाले आहेत. यात खतरनाक अल्फा व्हेरिएंटचाही समावेश आहे. hiv positive woman Has Corona infection for 216 days develops 32 virus mutations inside body
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत शास्त्रज्ञांना HIVने ग्रस्त असलेल्या एका 36 वर्षीय महिलेमध्ये कोरोनाचे खतरनाक म्यूटेशन आढळले आहेत. महिलेच्या शरीरात कोरोनाचा विषाणू 216 दिवसांपासून आहे. यादरम्यान कोरोनाचे 32 प्रकारचे म्यूटेशन झाले आहेत. याप्रकरणाची रिपोर्ट मेडिकल जर्नल medRxiv मध्ये प्रीप्रिंट करण्यात आली आहे. विषाणूच्या एवढ्या म्यूटेशनचा शोध लागल्यानंतर शास्त्रज्ञ हैराण झाले आहेत. यात खतरनाक अल्फा व्हेरिएंटचाही समावेश आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, महिला 2006 मध्ये HIVने संक्रमित झाली होती. यानंतर हळूहळू तिची रोग प्रतिकार शक्ती कमजोर होत गेली. सप्टेंबर 2020 मध्ये ही महिला कोरोनाने संक्रमित झाली. यानंतर विषाणूने स्पाइक प्रोटीनमध्ये 13 म्यूटेशन केले आणि 19 इतर जेनेटिक परिवर्तन केल. यामुळे विषाणूचा व्यवहार बदलला. यावरून महिलेच्या शरीरात एकूण 32 म्यूटेशन तयार झाले. यापैकी काही ‘वेरिएंट्स ऑफ कंसर्न’ (चिंतेचे व्हेरिएंटस) आहेत.
महिलेच्या शरीरात आढळलेल्या व्हेरिएंटमध्ये E484K म्यूटेशनचा समावेश आहे, जो सर्वात आधी ब्रिटेनमध्ये पाहण्यात आला होता. हा अल्फा वेरिएंट B.1.1.7 चाच भाग आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आढळलेल्या बीटा वेरिएंट B.1.351 चे N510Y म्यूटेशनही महिलेच्या शरीरात पाहायला मिळाले. शास्त्रज्ञांच्या मते, महिलेने हे म्युटेशन इतरांपर्यंत पसरवले की नाही, अद्याप हे स्पष्ट झालेले नाही. यामुळे काळजी वाढली आहे.
hiv positive woman Has Corona infection for 216 days develops 32 virus mutations inside body
महत्त्वाच्या बातम्या
- ममतांचा पराभव करणाऱ्या शुभेंदूंवर चोरीचा आळ, अधिकारी बंधूंविरोधात FIR, एक लाखाचे मदत साहित्य केंद्रीय सशस्त्र बलाचा वापर करून चोरल्याचा अजब आरोप
- बंगालमध्ये विरोधकांना मतदान केल्याची शिक्षा मिळत आहे, राज्यपाल धनखड यांचे ट्वीट
- दिल्लीच्या रुग्णालयात नर्सना ड्यूटीदरम्यान मल्याळम बोलणावर बंदी, तीव्र निषेधानंतर आदेश मागे
- Corona Updates : कोरोना संसर्गाच्या वेगाला ब्रेक, २ महिन्यांत सर्वात कमी १.१४ लाख नवीन रुग्ण, २४ तासांत २६७७ मृत्यू
- ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास, मुंबईतील रुग्णालयात दाखल