चीनी व्हायरसविरुध्द लढण्यासाठी इतर देशांनाही पंतप्रधानांचे बळ

भारतात चीनी व्हायरसविरुध्दची लढाई सर्व पातळ्यांवर लढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक पातळीवरही मित्र देशांना नैतिक बळ देत आहेत. पंतप्रधानांनी स्वीडनचे पंतप्रधान तसेच ओमानचे सुलतान यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. सार्क देशांमधले पंतप्रधानही सातत्याने भारताच्या संपर्कात आहेत. एवढेच नव्हे तर पाच एप्रिलच्या रात्री नऊ मिनिटे वीजेचे दिवे बंद ठेवण्याच्या मोदी यांच्या आवाहनालाही ईशान्य-पूर्वेतील अनेक देशांनी पाठींबा दिला होता.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतात चीनी व्हायरसविरुध्दची लढाई सर्व पातळ्यांवर लढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक पातळीवरही मित्र देशांना नैतिक बळ देत आहेत. पंतप्रधानांनी स्वीडनचे पंतप्रधान तसेच ओमानचे सुलतान यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

पंतप्रधानांनी नुकतीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार अमेरिकेसह काही मित्र देशांना औषधे पुरविण्याचीही तयारी त्यांनी दर्शविली आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोव्हेन यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी कोविड-19 या जागतिक साथीच्या आजाराच्या सद्यस्थितीविषयी तसेच या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच त्याच्या आर्थिक परिणामांवरच्या उपाययोजनांवर चर्चा केली.

भारतीय आणि स्वीडिश संशोधकांनी यासंदर्भात विकसित केलेले संशोधन, माहिती आणि आकडेवारी परस्परांना देण्याबाबत यावेळी दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली, ज्याचा कोविड विरुद्धच्या जागतिक लढ्यात लाभ होऊ शकेल. भारत आणि स्वीडनचे जे नागरिक दोन्ही देशात लॉकडाऊनमुळे अडकले आहेत, त्या सर्व नागरिकांना आवश्यक त्या सुविधा आणि मदत पोहचवण्याची ग्वाही, दोन्ही नेत्यांनी परस्परांना दिली. कोविड-19 चा सामना करतांना आवश्यक त्या औषधांच्या पुरवठ्यासाठी दोन्ही देशातले अधिकारी संपर्कात राहतील, असेही या चर्चेत ठरले.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात