अफ्रिकेतील नायजेरिया या देशाने ट्विटर कंपनीला चांगलाच धडा शिकविला आहे. राष्ट्राध्यक्षांचेच ट्विट डिलीट केल्याने नायजेरियन सरकारने ट्विटरवर अमर्यादित कालावधीसाठी बंदी घातली आहे.Nigeria teaches a lesson to Twitter, banning deletion of President’s tweet, raises hopes of Indian company
विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : अफ्रिकेतील नायजेरिया या देशाने ट्विटर कंपनीला चांगलाच धडा शिकविला आहे. राष्ट्राध्यक्षांचेच ट्विट डिलीट केल्याने नायजेरियन सरकारने ट्विटरवर अमर्यादित कालावधीसाठी बंदी घातली आहे.
नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद्दू बुहारी यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचं सांगत ट्विटरने त्याच्या हॅण्डलवरील ट्विट डिलीट केलं. त्यानंतर सरकारने ट्विटरवर बंदी घालत असल्याची घोषणा केली.
नायजेरियन सरकारच्या माहिती आणि सांस्कृतिक मंत्रालयाने जारी केलेल्या वक्तव्यात म्हटले आहे की, देशातील सरकारने मायक्रोब्लॉगिंग आणि सोशल नेटवर्किंग साईट असणाऱ्या बुधवारी ट्विटरने राष्ट्राध्यक्ष मोहम्मद्दू बुहारी यांचं एक ट्विट नियमांचं उल्लंघन होत असल्याचं सांगत डिलीट केलं.
या ट्विटवर देशातील अनेकांनी प्रतिक्रिया देताना राष्ट्राध्यक्ष युद्ध करण्यासाठी चिथावणी देत असल्याचा आरोप केला होता.नायजेरियामध्ये ट्विटरची जागा घेण्याचा प्रयत्न कू ही भारतीय कंपनी करत आहे.
कू कंपनीचा हा प्रयत्न यशस्वी झाल्यास कंपनीचा मोठा फायदा होणार आहे. कू चे सहसंस्थापक असणाºया अप्रमेय राधाकृष्ण यांनी नायजेरियामध्ये ट्विटरवर बंदी घातल्यानंतर एक ट्विट केलं आहे.
कू आता नायजेरियामध्ये सुद्धा उपलब्ध आहे. आम्ही तेथील स्थानिक भाषांमध्ये सेवा देण्याचा विचार करत आहोत. याबद्दल तुम्हाला काय वाटतं?, असं अप्रमेय यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.या ट्विटमध्ये त्यांनी नायजेरियात कू उपलब्ध असल्याचा स्क्रीनशॉर्टही शेअर केलाय.
अनेकांनी यावरुन अप्रमेय यांना सल्ले आणि शुभेच्छाही दिल्या आहेत. कू ही कंपनी बंगळुरुमधील असून ती पूर्णपणे भारतीय असल्याचे कंपनीचे संस्थापक असणाºया अप्रमेय आणि मयंक बिडावटका यांनी सांगितले आहे.
भारतामध्ये समाजमाध्यमांसंदभार्तील नवीन नियमांवरुन भारत सरकार आणि ट्विटरवरुन वाद सुरु आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या वैयक्तिक ट्विटर हॅण्डल आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ट्विटर हॅण्डलसमोरील ब्लू टीक ट्विटरने हटविली होती. मात्र, सरकारकडून ट्विटरला जाब विचारला गेल्यावर पुन्हा ब्लू टीक प्रदान करण्यात आली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App