विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये २०२३ पासून २० टक्के इथेनॉल मिसळण्याचा निर्णय घेतला आहे. ही मुदत दोन वर्षे अलीकडे आणली आहे. गेल्या वर्षी केंद्राने २०२२ पर्यंत १० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे लक्ष्य ठेवले होते. त्याचप्रमाणे, २०३० पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याचे उद्दिष्टही ठेवले होते. India needs one core ethanol
देशाला पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी २०२३ पर्यंत एक कोटी लिटर इथेनॉल लागेल. देशभरातील साखर कारखान्यांकडून इथेनॉल निर्मितीसाठी ६० लाख टन साखर पुरविली जाईल. यातून ७० लाख लिटर इथेनॉल तयार होईल. उर्वरित इथेनॉल अतिरिक्त धान्यापासून मिळेल. भारतीय मानक ब्युरोच्याच्या दर्जानुसार देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना २० टक्क्यांपर्यत इथेनॉल मिसळलेले पेट्रोल विकण्याची सूचना केंद्र सरकाने तेल कंपन्यांना केली आहे. तेल मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली असून १ एप्रिल २०२३ पासून याची अंमलबजावणी होणार आहे, असेही त्यात म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App