वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : अमेरिकेकडून जूनअखेर भारताला लसपुरवठा केला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जगभरात जूनअखेरपर्यंत किमान आठ कोटी लशीचे डोस वितरित करण्याची अमेरिकेची योजना आहे. US anti-corona vaccine to arrive in India by end of month; There will be 8 crore doses in the world
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती आणि कमला हॅरिस यांच्यात याबाबत चर्चा झाली. भारतासह अन्य देशांना जूनअखेरपर्यंत कोरोना प्रतिबंधक लसपुरवठा करणार असल्याचे अमेरिकेने गुरुवारी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर अमेरिकी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचे आभार मानल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
जगभरात जूनअखेरपर्यंत किमान आठ कोटी डोसचे वाटप करण्याचे अमेरिकेचे धोरण आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २.५ कोटी डोस भारतासह काही देशांना करण्यात करण्याचे नियोजन आहे. अमेरिकेच्या या लस सहकार्याबाबत पंतप्रधानांनी अनेक ट्विट संदेश प्रसृत केले. कमला हॅरिस यांच्याशी चर्चा करून लसपुरवठ्याबाबत अमेरिकी सरकारचे आभार मानले. जागतिक आरोग्य क्षेत्रातील भागिदारी, अर्थव्यवस्थेची फेरउभारणी आदी मुद्यांवरही मोदी यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App