पाकिस्तानलगतच्या नियंत्रण रेषेवरील शस्त्रसंधी असली तरी किती काळ हे शेजारी देशाच्या कृतींवर अवलंबून राहील, अशा शब्दांत लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी इशारा दिला आहे. सीमेवरील दहशतवादाचे जाळे अद्याप कायम असल्यामुळे आपल्या तयारीत कुठलेही शैथिल्य येणार नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.Army chief Manoj Narwane warns of arms embargo on Pakistan border but how long it depends on their actions
विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : पाकिस्तानलगतच्या नियंत्रण रेषेवरील शस्त्रसंधी असली तरी किती काळ हे शेजारी देशाच्या कृतींवर अवलंबून राहील, अशा शब्दांत लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी इशारा दिला आहे.
सीमेवरील दहशतवादाचे जाळे अद्याप कायम असल्यामुळे आपल्या तयारीत कुठलेही शैथिल्य येणार नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.लष्करप्रमुख जनरल नरवणे काश्मीरच्या दोन दिवसांच्या भेटीवर होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले, नियंत्रण रेषेवरील शस्त्रसंधी सध्या लागू आहे. ती कायम राहील याची जबाबदारी संपूर्णत: पाकिस्तानवर आहे. ते शस्त्रसंधीचे पालन करतील, तोवर ती पाळण्याची आमची इच्छा आहे.
नियंत्रण रेषेच्या पलीकडील भागात दहशतवादी शिबिरे आणि दहशतवाद्यांचा वावर यांसह इतर दहशतवादी कारवाया पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरू आहेत. त्यामुळे आमच्या तयारीमध्ये कुठलीही शिथिलता येऊ शकत नाही.
शस्त्रसंधीला आता १०० दिवस झाले असल्यामुळे पाकिस्तानवर भरवसा ठेवला जाऊ शकतो काय, असे विचारले असता लष्करप्रमुख म्हणाले, भारत व पाकिस्तान यांच्यात अनेक दशकांपासून अविश्वाास आहे.
त्यामुळे त्या आघाडीवरील परिस्थिती एका रात्रीत बदलू शकत नाही. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे खऱ्या अथार्ने पालन केले, तर लहान-लहान पावलांमुळेही वाढीव फायदे होऊ शकतात.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App