संपूर्ण लसीकरण झालेल्यांना कोणताही धोका नसल्याने परदेश प्रवासासाठी परवानगी देण्यासाठी पासपोर्ट द्या अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे खासदार सुरेश प्रभू यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पूरी यांच्याकडे केली आहे.Give passports to those who have been fully vaccinated, allow them to travel freely, demands of Suresh Prabhu
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संपूर्ण लसीकरण झालेल्यांना कोणताही धोका नसल्याने परदेश प्रवासासाठी परवानगी देण्यासाठी पासपोर्ट द्या अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे खासदार सुरेश प्रभू यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पूरी यांच्याकडे केली आहे.
प्रभू यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की देशात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने ओसरत आहे. त्याचबरोबर कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मृत्यूचे प्रमाणही कमी होत आहे.
त्यामुळे लसीकरण झालेल्यांना पासपोर्ट देणे सुरू करा. त्यांना मुक्त प्रवास करू द्या. त्यामुळे परिस्थिती सुधारेल. पुन्हा पहिल्यासारखी होईल. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सध्या परदेश प्रवासावर निर्बंध आहेत.
अनेक देशांनीही भारतातून येणाºया प्रवाशांवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे अनेकांना परदेश प्रवास करणे शक्य नाही. या पार्श्वभूमीवर संपूर्ण लसीकरण झालेल्यांना परदेश प्रवासासाठी पासपोर्ट देण्याची मागणी प्रभू यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App