विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : एली लिली अँड कंपनीजने (एलएलवाय.एन) तयार केलेल्या अँटीबॉडी मिश्रणाच्या आपत्कालीन वापरास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे कोरोनाविरोधातील लढाईमध्ये डॉक्टरांच्या हाती आता आणखी एक प्रभावशाली शस्त्र आले आहे. Doctors get new medicine for fight corona
मोनोक्लोनाल अँटीबॉडीज या नैसर्गिक अँटीबॉडीजप्रमाणे वागतात यामुळे मानवी शरीराला कोरोना संसर्गाशी लढण्यासाठी बळ मिळते. देशातील कोरोना उपचारावरील प्रक्रियेला वेग यावा म्हणून आमची कंपनी भारत सरकार आणि नियामक यंत्रणेच्या संपर्कात होती असेही कंपनीने म्हटले आहे. रिजेनेरॉन आणि रोश या कंपनीने तयार केलेल्या कॉकटेल अँटीबॉडी औषधाला मे महिन्यातच आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे
सौम्य ते मध्यम लक्षणे असणाऱ्या कोरोनावरील उपचारासाठी या औषधाचा वापर होणार आहे. कोरोनाच्या संसर्गाची दुसरी लाट आणखी तीव्र झाली असताना हे औषध डॉक्टरांच्या हाती येणे महत्त्वपूर्ण मानले जाते. सर्वसाधारणपणे प्रौढांवरील उपचारासाठी या औषधाचा वापर करण्यात येईल, असे कंपनीच्या भारतातील शाखेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App