रशियन कोरोना प्रतिबंधक लस स्फुटनिक व्हीचे ३० लाख डोस मंगळवारी पहाटे भारतात दाखल झाले आहेत. आजपर्यंत परदेशातून मिळालेले हे सर्वाधिक डोस आहेत. हैैद्राबाद विमानतळावर खास विमानातून हे डोस पहाटे मंगळवारी पहाटे आणण्यात आले.3 million doses of Sputnik V vaccine delivered to India from Russia, brought to Hyderabad by special plane
विशेष प्रतिनिधी
हैैद्राबाद : रशियन कोरोना प्रतिबंधक लस स्फुटनिक व्हीचे ३० लाख डोस मंगळवारी पहाटे भारतात दाखल झाले आहेत. आजपर्यंत परदेशातून मिळालेले हे सर्वाधिक डोस आहेत. हैैद्राबाद विमानतळावर खास विमानातून हे डोस पहाटे मंगळवारी पहाटे आणण्यात आले.
पॉनिसिआ बायोटेक या कंपनीत हे डोस आणण्यात आले आहत. सुमारे ५६.५ मेट्रिक टन वजनाची ही शिपमेंट खास विमानाने आणण्यात आली. आजपर्यंतची ही सर्वात मोठी आयात आहे,
यापूर्वी सरकारने म्हटले होते की भारताला मे अखरेपर्यंत सहा लाख स्फुटनिक लसीचे डोस आयात होणार आहे. जून महिन्यात एक कोटी तर जुलैै महिन्यात २.८ कोटी डोस मिळणार आहेत. त्यार्पीिं ४० लाख लसींचे उत्पादन भारतात होणार आहे.
ऑगस्ट महिन्यापासून भारतात तयार झालेल्या स्फुटनिक लसी बाजारात उपलब्ध होणार आहेत. सहा भारतीय कंपन्यांशी त्यासाठी तंत्रज्ञान हस्तांतरणाचा करार करण्यात आला आहे.
रशियानिर्मित ‘स्पुतनिक व्ही’ लसीचे ३० लाख डोस मे महिन्याच्या शेवटपर्यंत भारतात दाखल होणार आहेत. तसेच लवकरच या लशीचं उत्पादन भारतातही सुरू होणार आहेत, अशी माहिती रशियातील भारतीय राजदूत डी बाला व्यंकटेश वर्मा यांनी गेल्या आठवड्यात दिली होती.
मे महिन्याच्या अखेरपर्यंत रशियाकडून भारताला ३० लाख ‘स्पुतनिक व्ही’ लसीचे डोस पुरवण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे रशियाने आपला शब्द पाळला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App