विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेले नियोजन प्रत्यक्षात उतरले तर येत्या डिसेंबरपर्यंत किमान तीनशे कोटी लशी उपलब्ध होतील. विशेषतः आॅगस्ट महिन्यापासून तर लशींची उपलब्धता अतिशय मोठ्या प्रमाणावर असेल. जर हे नियोजन प्रत्यक्षात उतरले तर डिसेंबरपर्यंत १८ वर्षांपुढील बहुतेक सर्व लोकसंख्येचे (सुमारे १०० कोटी) लसीकरण झालेले असेल. एकूण अजून १८० कोटी लशींची (२१ कोटी लसी यापूर्वीच दिल्या आहेत) गरज असताना डिसेंबरपर्यंत तब्बल ३०० कोटी लशी उपलब्ध झालेल्या असतील. त्यामुळेच पात्र लोकसंख्येचे लसीकरण वर्षाअखेर करण्याची हमी केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. Centre estimates 300 crores vaccines will available by december end
सध्या सीरमची कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि रशियाच्या मदतीने तयार झालेली स्फुटनिक अशा तीन लशी उपलब्ध आहेत. स्फुटनिकची निर्मिती डाॅ. रेड्डीज लॅबमार्फत आता होत आहे. त्याचबरोबर आयातही केली जात आहे. मात्र, आॅगस्टपासून जाॅन्सन, बीबीआयएलची इंट्रानासल, सीरमच्या मदतीने नोवोव्हॅक्स तयार करीत असलेली कोवोव्हॅक्स या ही लसी तयार होतील.
परिणामी जूनमध्ये ११ कोटी, जुलैमध्ये १४.८१ कोटी, आॅगस्टमध्ये ३७.८ कोटी, सप्टेंबरमध्ये ५२.९ कोटी, आॅक्टोबरमध्ये ५४.३ कोटी, नोव्हेंबरमध्ये ६१ कोटी तर डिसेंबरमध्ये ६३ कोटी लशी मिळतील. म्हणजे पुढील सात महिन्यांत २९४.८१ कोटी लशी भारतीयांसाठी उपलब्ध असतील. याशिवाय माॅडर्ना, फायझर, बीसीजी यांच्या लशी उपलब्ध होतील. भारतातील प्रमुख औषध उत्पादक कंपनी वोकहार्टने तर दोनशे कोटी लशी उत्पादित करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. याशिवाय जागतिक आरोग्य संघटनेकडूनही कोव्हॅक्स योजनेतून काही लशी मिळतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App