इंदूरमधील सेक्स स्कँडल प्रकरणातील चित्रफिती आपल्याकडे असल्याची दर्पोक्ती करत सरकारला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करणारे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ चांगलेच अडचणीत आले आहेत. हनी ट्रॅप स्कँडलची तपासणी करणाऱ्या विशेष तपासणी पथकाकडून कमलनाथ यांची चौकशी होणार आहे.Former Chief Minister Kamal Nath to be questioned in Honey Trap scandal
विशेष प्रतिनिधी
भोपाळ : इंदूरमधील सेक्स स्कॅँडल प्रकरणातील चित्रफिती आपल्याकडे असल्याची दर्पोक्ती करत सरकारला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करणारे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ चांगलेच अडचणीत आले आहेत.
हनी ट्रॅप स्कँडलची तपासणी करणाऱ्या विशेष तपासणी पथकाकडून कमलनाथ यांची चौकशी होणार आहे.२०१९ साली समोर आलेल्या ‘सेक्स स्कँडल’ प्रकरणाशी निगडीत महत्त्वाच्या फाईल्स सोपवण्याचे निर्देश मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना देण्यात आले आहेत.
त्यांना फाईल सोपवण्यासाठी नोटिस पाठवली आहे. सोबतच, या प्रकरणात कमलनाथ यांची २ जून रोजी त्यांच्या शामला हिल्स स्थित निवासस्थानी चौकशीही करण्यात येणार आहे.
४० वर्षीय एका महिलेच्या आत्महत्या प्रकरणात माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार उमंग सिंघार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली होती. मोहालीची रहिवासी असलेल्या या महिलेचे उमंग सिंघार यांच्याशी संबंध होते,
काही दिवसांत हे दोघे विवाहबंधनातही अडकणार होते, असा आरोप भाजपकडून करण्यात आला. महिलेच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी उमंग सिंघार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
त्यानंतर ‘सेक्स स्कँडलशी निगडीत पेन ड्राईव्ह आपल्याकडे अजूनही असल्याचे सांगत कमलनाथ यांनी ब्लॅकमेलींगचा प्रयत्न केला होता. त्यांनी राज्यातील भाजप सरकारला अप्रत्यक्षरित्या आव्हान दिले होते. मात्र आता त्यांचीच चौकशी होणार असल्याने कमलनाथ चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App