राज्यातील सत्ता ज्या ज्या वेळी काका-पुतण्यांच्या हातात जाते, त्यावेळी धनगर समाजावर जाणीवपूर्वक अन्याय केला जातो, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांनी निशाणा साधला आहे.MLA Gopichand Padalkar alleges deliberate injustice to Dhangar community when power goes to Pawar family
प्रतिनिधी
अहमदनगर: राज्यातील सत्ता ज्या ज्या वेळी काका-पुतण्यांच्या हातात जाते, त्यावेळी धनगर समाजावर जाणीवपूर्वक अन्याय केला जातो, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांनी निशाणा साधला आहे.चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्तअभिवादन केल्यानंतर पडळकर यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.
ते म्हणाले, जेव्हा यांच्या हातात सत्ता येते, तेव्हा धनगर समाजावर जाणीवपूर्वक अन्याय केला जातो. त्यांना हक्कांपासून वंचित ठेवले जाते. एकीकडे मराठा आरक्षणासाठी न्यायालयात लाखो रुपये खर्चून वकिलांची फौज उभी केली जाते.
मात्र, धनगर आरक्षणासाठी सुरू असलेल्या प्रकरणात एक चांगला वकीलही दिला जात नाही. ज्या सवलती आदिवासींना मिळत आहेत, त्याच धनगरांना देण्याचा निर्णय झालेला आहे. त्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आलेली आहे.
मात्र, अंमलबजावणी झालेली नाही. यासाठी केलेल्या तरतुदीचा पैसा कोठे गेला हेही कळत नाही. हा सगळा काका-पुतण्याचा काळाबाजार आहे.बहुजन समाज जागा झाला आहे. आमच्या मागण्या आम्ही मान्य करून घेऊच.
वेळीच जागे व्हा अन्यथा धनगर समाजाने मुंबईला वेढा दिला तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल असा इशारा देऊन पडळकर म्हणाले, धनगर समाजातील तरुणांनी हे सगळे समजून घ्यावे. न्याय्य हक्क आपल्याला दिले जात नाहीत.
मेंढपाळांना देय असलेली रक्कम दोन वर्षांपासून देण्यात आलेली नाही. राज्यकर्त्यांना आपण राजकीय विरोध केल्याशिवाय त्यांना जाग येणार नाही. जेव्हा धनगर समाज आपल्या हक्कांसाठी मुंबईला वेढा देईल, तेव्हा यांना पळता भुई थोडी होईल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App