वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात आत्तापर्यंत आठ कोटी ८० लाख ४७ हजार ५३ पुरुषांनी लस घेतली असून महिलांची संख्या सात कोटी ६७ लाख ६४ हजार ४७९ इतकी आहे. मात्र, ‘इतर’ वर्गातील केवळ २५, ४६८ जणांचेच लसीकरण झाल्याचे कोविन पोर्टलवरील आकडेवारीतून सिद्ध होते. Transgender ignored in vaccination process
आत्तापर्यंत २५, ४६८ तृतीयपंथीयांनी लस घेतली असून केवळ ५.२२ टक्के तृतीयपंथींयांचे लसीकरण झाले आहे. चुकीची माहिती, कागदपत्रांचा अभाव आणि डिजिटल दरीमुळे लसीकरणातील त्यांच्या अडचणीत भर पडल्याचा कार्यकर्त्यांचा दावा आहे.
लशीबद्दल त्यांच्यामध्ये गैरसमज पसरविले जात आहेत. लस घेतल्याने आरोग्यावर विपरित परिणाम होईल, असे त्यांना सांगितले जाते. कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी लवकरात लवकर लस घेण्याचा सल्ला त्यांना देण्यात येत आहे. शकीला या ३० वर्षीय तृतीयपंथीयाची सुरुवातीला लशीची तयारी नव्हती. मात्र, कार्यकर्त्यांनी समुपदेशनातून भीती घालविल्यानंतर ती तयार झाली.
शकीला म्हणाली, की लशीमुळे मृत्यू येईल, अशी भीती माझ्या मैत्रिणींनी घातली. मात्र, मी याबाबत कार्यकर्त्यांना विचारल्यावर त्यांनी ही गोष्ट खोटे असल्याचे सांगितले. त्यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी लवकरात लवकर लस घेण्याचा सल्लाही दिला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App