विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – फरार उद्योगपती मेहूल चोक्सीला आणण्यासाठी भारताने खास प्रायव्हेट जेट विमान डोमिनिका या देशात पाठवले आहे. कतार एअरवेजचे हे प्रायव्हेट जेट विमान दिल्लीहून २८ तारखेला दुपारी पावणे चार वाजता निघाले आणि स्थानिक वेळेनुसार त्याच दिवशी डोमिनिकाला पोहोचले. येथील न्यायालयाने चोक्सीला देशाबाहेर पाठविण्यास मनाई केल्याने तो अद्यापही डोमिनिकामध्येच आहे. India send private jet for Mehul Choksi
दरम्यान, अँटिग्वा येथील जॉली हार्बर येथून पोलिसांसारखा गणवेश घातलेल्या व्यक्तींनी आपले अपहरण केल्याचा दावा मेहुल चोक्सीने केला आहे. या व्यक्तींपैकी काही जण भारतीय असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. या लोकांनी आपल्याला डोमिनिकाला आणल्याचे त्याने न्यायालयात सांगितले.
फरार हिरेव्यापारी नीरव मोदीचा मामा असलेला मेहुल चोक्सी हा देखील पंजाब बँक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी आहे. अँटिग्वामध्ये आश्रय घेतलेला चोक्सी गेल्या आठवड्यात बेपत्ता झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. तो डोमिनिकामध्ये असल्याचे आढळून आल्यावर त्याला भारताच्या ताब्यात देण्याची मागणी झाली होती. यावरून सध्या मतभेद आहेत. मात्र या दरम्यान भारताने त्याच्या हस्तांतरासाठी आवश्य्क असलेली कागदपत्र विशेष विमानाद्वारे तातडीने डोमिनिकाला पाठवल्याचे तेथील माध्यमांमध्येही सांगितले गेले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App