वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र फैलाव रोखण्यासाठी लसीकरण हे सर्वात मोठं हत्यार आहे. त्यासाठी जून महिन्यात 12 कोटी लशींचे डोस उपलब्ध केले जातील, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.Nearly 12 crore vaccine doses will be available for National COVID vaccination program in June 2021: Union Health Ministry गेल्या काही दिवसात लस नसल्यामुळे लसीकरण मंदावले आहे. या मुद्यावर विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर लासीबाबत आनंदाची बातमी आरोग्यमंत्रालयाने दिली. देशात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहीम 1 मे पासून सुरु झाली आहे. शुक्रवारपर्यंत देशात 20.86 कोटी डोस दिले आहेत. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात 1.82 कोटी लशींचे डोस उपलब्ध आहेत.
पुढच्या तीन दिवसात 4 लाखांहून अधिक डोस मिळतील असं सांगण्यात आलं आहे. प्रत्येक महिन्यात ५० टक्के लशी केंद्र सरकारकडून खरेदी केल्या जातात. त्या राज्यांना विनामुल्य पुरवल्या जातात. उर्वरित ५० टक्के लशी राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना खरेदी करण्याची परवानगी आहे.
शनिवारी 28 लाख जणांना डोस
दरम्यान, लसीकरणाच्या १३४ व्या दिवशी म्हणजे शनिवारी २८ लाख ९ हजार ४३६ जणांना लसीचे डोस दिले आहेत. कोव्हॅक्सिन, कोविशील्ड आणि स्पुटनिक व्ही या लशी देशात उपलब्ध आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App