‘नोट’ ना फाटणार ना भिजणार ! रिझर्व्ह बँक लवकरच जारी करणार १०० रुपयांची नवी ‘वार्निश पेंट’ नोट ; केंद्र सरकारनचा ग्रीन सिग्नल

आरबीआय १ अब्ज १०० रुपयांच्या नोटा छापण्याच्या तयारीत आहे. या नोटा सुरक्षितता आणि टिकाऊपणासाठी वार्निशने लेप दिलेल्या असतील. सेंट्रल बँक सध्या फील्ड ट्रायल रन करीत आहे, जर यशस्वी झाले तर बँक १०० रुपयांच्या नवीन नोटा बाजारात आणेल आणि हळूहळू जुन्या १०० रुपयांच्या नोटा बंद होतील. Rs100 Note: RBI to issue new Rs 100 varnish paint note soon; Central government’s green signal


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : १०० रुपयांची नवीन नोट भारतीय रिझर्व्ह बँक आणणार आहे. याची खासियत म्हणजे ही नोट चमकदार असणार आहे. त्याचबरोबर ही नोट टिकाऊ असेल. ही नोट मोठ्या प्रमाणात भारतीय चलनात आणण्यात येणार आहे. ही नवीन नोट वार्निश पेंट केल्याने फाटणार नाही, पाण्यात देखील भिजणार नाही. त्यामुळे ही नोट जपून ठेवण्याची गरज देखील नाही.

दरवर्षी लाखो करोडो रुपयांच्या फाटलेल्या, खराब झालेल्या नोटा रिझर्व्ह बँकेला बदलुन द्याव्या लागतात. त्यातच जगातील अनेक देश प्लॅस्टिकच्या चलनी नोटांचा वापर करीत आहेत. या नोटेचे डिजाईन असे केले आहे, ज्यामुळे हे दृष्टीहीन लोकांना देखील सहजपणे ओळखता येईल. या नोटांच्या चांगल्या क्वालिटीसाठी मुबंईत बँकनोट क्वॉलिटी एश्योरंन्स लॅबोरेटरी स्थापित केली आहे.



१०० रुपयांच्या नवीन नोटांच्या वार्निश पेंट विषयी आरबीआयने आपल्या वार्षिक अहवालात नमूद केले आहे. वार्निश लाकडी फर्निचरचे पाणी , तापमान आणि कीटकांपासून बचाव करण्यासाठी वापरला जातो. तथापि, बँकेने नोटचा रंग बदलला नाही .

केंद्र सरकारने यास आधीच मान्यता दिली आहे. गेल्या वर्षी राज्याचे अर्थमंत्री अनुराग ठाकूर यांनी वरील सभागृहात याचा उल्लेख केला होता. त्यांनी नमूद केले की सरकारने या १०० रुपयांच्या नोटा जारी करण्यासाठी आरबीआयला ग्रीन सिग्नल दिला आहे.

Rs100 Note: RBI to issue new Rs 100 varnish paint note soon; Central government’s green signal

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात