Pulwama Martyr Major Dhoundiyal’s Wife Set To Join Indian Army As Lieutenant Nikita Dhoundiyal
विभू मी नेहमीच तुझ्यावर प्रेम करत राहीन. नेहमीच जिवंत राहशील. आय लव्ह यू विभू… जय हिंद’ ! आणि पतीच्या बलिदानाला श्रद्धांजली म्हणून निकिताने सशस्त्र दलात भरती होण्याचा निर्णय घेतला.
विशेषप्रतिनिधी
नवी दिल्ली : पुलवामा येथे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत मेजर विभूती शंकर धौंडीयाल हे शहीद झाले होते. तेव्हा त्यांचं ९ महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. त्यांच्या ९ महिन्यांच्या संसारात त्यांची साथ देणाऱ्या नितिका कौल धौंडीयाल यांनी पतीच्या जाण्याचं दुःख विसरून सैन्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला.Pulwama Martyr Major Dhoundiyal’s Wife Set To Join Indian Army As Lieutenant Nikita Dhoundiyal
#WATCH Wife of Major VS Dhoundiyal (who lost his life in an encounter in Pulwama yesterday) by his mortal remains. #Dehradun #Uttarakhand pic.twitter.com/5HWD6RXwnO — ANI (@ANI) February 19, 2019
#WATCH Wife of Major VS Dhoundiyal (who lost his life in an encounter in Pulwama yesterday) by his mortal remains. #Dehradun #Uttarakhand pic.twitter.com/5HWD6RXwnO
— ANI (@ANI) February 19, 2019
काश्मीरच्या पुलवामामध्ये ८ फेब्रुवारी २०१९ ला दहशतवादी आणि भारतीय सैन्यात चकमक झाली होती. या चकमकीत मेजर विभूती धौंडियाल शहीद झाले. ‘५५ राष्ट्रीय रायफल्स’चा एक भाग होते. ३४ वर्षीय शहीद मेजर विभूती यांचा मरणोत्तर शौर्य चक्र पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. निकिता कौल धौंडियाल या शहीद मेजर विभूती यांच्या पत्नी आहेत.
#NationAlwaysFirst. Maj Vibhuti Dhoundiyal, SC made the #SupremeSacrifice on 18 Feb 19 at #Pulwama. His wife Ms Nitika Kaul Dhoundiyal has cleared the Short Service Commission exam & SSB. Now awaits the merit list. #ChinarCorps salutes the brave lady for her great courage. pic.twitter.com/jIfdClVipt — Chinar Corps🍁 – Indian Army (@ChinarcorpsIA) February 20, 2020
#NationAlwaysFirst. Maj Vibhuti Dhoundiyal, SC made the #SupremeSacrifice on 18 Feb 19 at #Pulwama. His wife Ms Nitika Kaul Dhoundiyal has cleared the Short Service Commission exam & SSB. Now awaits the merit list. #ChinarCorps salutes the brave lady for her great courage. pic.twitter.com/jIfdClVipt
— Chinar Corps🍁 – Indian Army (@ChinarcorpsIA) February 20, 2020
धौंडीयाल यांचं बलिदान निकिता यांनी व्यर्थ जाऊ दिलं नाही. सहा महिन्यानंतर निकिता यांनी Short Service Commission चा फॉर्म भरला आणि नितिका कौल धौंडीयाल परिक्षेत उत्तीर्णही झाल्या.
त्यानंतर चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमीमधून त्यांनी ट्रेनिंग घेतली. आता या वीरपत्नीची ट्रेनिंग पूर्ण झाली आहे. त्या आता लेफ्टनंट म्हणून सैन्यात भरती होण्यास तयार आहेत.
चेन्नईत त्यांनी Officers Training Academy प्रशिक्षण घेतलं आणि आता २९ मे २०२१ ला त्या भारतीय सैन्यात लेफ्टनंट निकिता कौल धौंडीयाल म्हणून रुजू होणार आहेत.
पतीच्या जाण्याचं दु:ख कुरवाळत न बसता सैन्यात दाखल होण्याचा निर्णय घेणाऱ्या नितिका धौंडीयाल यांचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.
२०१९ साली दहशदवाद्यांनी पुलवामा येथे केलेल्या भ्याड हल्ल्याच्या जखमा आजही ताज्या आहेत. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी कार बॉम्बच्या मार्फत केलेल्या हल्ल्यात भारताचे ४० जवानांना वीरमरण प्राप्त झालं.
लेफ्टनंट कर्नल विकास नौटियाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिता 29 मे रोजी पासआऊट होतील. शहीद मेजर विभूती यांना अखेरचा निरोप देताना निकिता यांची बरीच चर्चा झाली होती.
तेव्हा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओत त्या विभूती यांच्या पार्थिवाजवळ उभ्या राहून मी खूप भाग्यशाली आहे की मला तुझ्यासारखा पती मिळाला. विभू मी नेहमीच तुझ्यावर प्रेम करत राहीन. नेहमीच जिवंत राहशील. आय लव्ह यू विभू… जय हिंद’ असं म्हणाल्या होत्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App