विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – बहुचर्चित रोश ॲटीबॉडी कॉकटेलचा पहिला वापर हरियानातील ८४ वर्षाच्या कोरोनाबाधित ज्येष्ठ नागरिकावर करण्यात आला. हे औषध कोरोनाविरोधातील लढाईत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असा दावा केला जात आहे. New medicine available in India against corona
सीडीएससीओने भारतात ॲटीबॉडी कॉकटेल हे कासीरिविमाब आणि इमडेविमाब यांना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. हेच औषध अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना झाल्यावर देण्यात आले होते.
स्वित्झर्लंडची औषध कंपनी रोश इंडिया आणि सिप्ला यांनी काल भारतात रोशची ॲटीबॉडी कॉकटेल लॉंच केल्याची घोषणा केली होती. त्याची किंमत ५९,७५० हजार रुपये प्रति डोस निश्चिलत करण्यात आली आहे. गंभीर रुग्णास हे औषध देण्यात येणार आहे.
गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात मोहब्बत सिंग यांच्यावर पाच दिवसांपासून उपचार सुरू आहेत. काल त्यांना या औषधाचा डोस दिला. हे औषध गंभीर रुग्णाची तब्येत आणखी ढासळण्यापासून, रुग्णालयात दाखल होण्यापासून आणि मृत्यूची जोखीम ७० टक्के कमी करण्यासाठी साह्यभूत ठरते. या औषधाचे सेवन करताच शरिरात वेगाने प्रतिपिंड तयार होतात आणि ते संसर्गाची तीव्रता कमी करतात. रोशचा डोस घेणाऱ्यांना दवाखान्यात दाखल करण्याची शक्यता ८० टक्क्यांनी कमी झाल्याचे संशोधकांनी दावा केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App