विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना रोखण्यासाठी लसीकरण हाच उपाय असतानाही केंद्राने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे केला. तर माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे की, सरकारच्या उदासीनतेमुळे लसीची प्रतिक्षा करणे भाग पडत आहे. Rahul Gandhi attacks BJP
दिल्ली, तेलंगण, महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये लस नसल्यावरून केंद्र सकारला धारेवर धरले. या राज्यांनी लसटंचाईचे कारण देत १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण स्थगित केले आहे. तरीही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गृहखाते लसटंचाईचा इन्कार करत आहेत.
देशातील ग्रामीण जिल्ह्यांमध्ये लसीकरणच नाही, मात्र जिल्हानिहाय लसीकरणाचे आकडे देखील पुढे येत नाहीत. सरकारचा नकार आणि उदासीनता याचा फटका लसीकरणाच्या प्रतिक्षेत असलेल्यांना बसतो आहे. अशी टीका काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केली आहे. दिल्लीने तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण थांबविल्याच्या निर्णयानंतर तेलंगणमध्येही १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबल्याने वाद सुरू झाला आहे. लस साठा नसल्यामुळे तेलंगणमधील ३३ पैकी २९ जिल्ह्यांमध्ये कोणालाही लस मिळालेली नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App