तामीळ आयसीसचे दहशतवादी दाखविल्याने फॅमिली मॅन- २ अडचणीत, खासदाराची बंदीची मागणी

येत्या ४ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवरील द फॅमिली मॅन या वेब सीरिजबाबत प्रचंड उत्सुकता आहे. नुकताच ट्रेलर प्रेक्षकांच्या समोर आला आहे. मात्र, तामीळ मुलगी आयसीसची दहशतवादी दाखविल्याने ही बेव सिरीज अडचणीत आली आहे.येत्या ४ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवरील द फॅमिली मॅन या वेब सीरिजबाबत प्रचंड उत्सुकता आहे. नुकताच ट्रेलर प्रेक्षकांच्या समोर आला आहे. मात्र, तामीळ मुलगी आयसीसची दहशतवादी दाखविल्याने ही बेव सिरीज अडचणीत आली आहे.Family man in trouble for showing Tamil ISIS terrorists, MP seeks ban


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : येत्या ४ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवरील द फॅमिली मॅन या वेब सीरिजबाबत प्रचंड उत्सुकता आहे. नुकताच ट्रेलर प्रेक्षकांच्या समोर आला आहे. मात्र, तामीळ मुलगी आयसीसची दहशतवादी दाखविल्याने ही बेव सिरीज अडचणीत आली आहे.

एमडीएमकेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार वाईको यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून या सीरिजवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. यामध्ये तामिळ लोकांची प्रतिमा ही नकारात्मक दाखवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.



 

अभिनेता मनोज वाजपेयी आणि सामंथा अक्कीनेनी यामध्ये मुख्य भूमिकेमध्ये पहायला मिळणार आहेत. तमिळ लोकांच्या विरोधात यामध्ये चित्रण करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.

फॅमिली मॅन २ च्या ट्रेलरमध्ये दक्षिणेतील अभिनेत्री सामंथा अक्कीनेनी राजी नावाचं पात्र साकारते आहे. राजी ही दहशदवादी आहे आणि ती सरकारविरुद्ध लढण्यासाठी ती निघाली आहे.

या सीरिजमध्ये चेन्नई शहराची पार्श्वभूमी दाखवण्यात आली आहे. तिथे मनोज वाजपेयी अभिनित श्रीकांत तिवारी राजीला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असे या ट्रेलमध्ये दाखवण्यात आले आहे.

या सीरिजमध्ये तामिळ लोक दहशतवादी आणि आयसिसचे एजंट असल्याचे आणि त्यांचा संबंध पाकिस्तानसोबत असल्याचे दाखवण्यात आल्याचे वायको यांनी म्हटलं आहे. यामुळे तामिळ समाजातील लोकांच्या भावनांना ठेच लागली आहे.

हे तामिळ संस्कृतीच्या विरुद्ध आहे. तामिळनाडूमध्ये लोकांनी या सीरिजवर मोठ्या प्रमाणात टीका केली आहे आणि याच्या विरोधात आंदोलन करत आहेत असे वायको यांनी जावडेकर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

याच्याआधी अनेकांनी या सीरिजवर बंदी घालण्याची मागणी केली होती. तमिळ लोकांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर चुकीचे वर्णन केलं आहे. तसेच यामध्ये एलटीटीईला दहशदवादी संघटना म्हटले आहे, असा दावा अनेकांनी केला होता.

Family man in trouble for showing Tamil ISIS terrorists, MP seeks ban

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात