कोरोना नसतानाही महिलेला काळ्या बुरशीचा आजार; बिहारमधील प्रकाराने सावधानतेचा इशारा

वृत्तसंस्था

पाटणा – कोरोनाची कोणतीही लक्षणे नसताना एका महिलेला म्युकर मायकोसिस झाल्याचे एक प्रकरण बिहारमध्ये समोर आले आहे. या महिलेवर सध्या पाटण्यातील ‘एम्स’ रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सर्व नागरिकांना, विशेषत: मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तींना सावधगिरीचा सल्ला दिला आहे. Red alert in Bihar due to mucarormicosis

आरा जिल्ह्यातील एका चाळीस वर्षीय महिलेला सुमारे २० दिवसांपूर्वी ताप आला होता. औषधाच्या दुकानातून तापावरील औषध आणून तिने ते घेतल्यानंतर तिचा लगेचच ताप गेला. यानंतर या महिलेला श्वातस लागणे, डोळे दुखणे असा कोणताही त्रास लागला नाही, की रुग्णालयात भरती होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली नाही. त्यामुळे तिने कोरोनाची चाचणीही केली नाही.



मात्र, दोन दिवसांनंतर तिच्या चेहऱ्याचा अर्धा भाग दुखू लागला आणि त्या भागातील डोळ्याने दिसणेही बंद झाले. तिचे डोळे सुजले. ऑक्सिजनची आवश्यझकता किंवा अतिदक्षता विभागात नसलेल्या या महिलेमध्ये दिसलेल्या या लक्षणांमुळे डॉक्टरही चक्रावले आणि त्यांनी सिटी स्कॅन केला असता काळी बुरशी झाल्याचे आढळले. यानंतर या महिलेला ‘एम्स’मध्ये दाखल करण्यात आले. या महिलेला इतर कोणता आजारही नव्हता.

Red alert in Bihar due to mucarormicosis

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात