मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पुन्हा एकदा लढा उभारण्यात येणार आहे. लढ्याचे राज्यस्तरीय रणशिंग कोल्हापूरात फुंकण्यात येणार आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती लढ्याचे नेतृत्त्व करणार आहेत. तर मराठा आरक्षणा संदर्भात 5 जूनला पहिला मोर्चा बीडमध्ये निघणारच अशी ठाम भूमिका मराठा नेते आमदार विनायक मेटे यांनी घेतली आहे.Maratha Reservation: Ranshing from Kolhapur, First Morcha from Beed
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पुन्हा एकदा लढा उभारण्यात येणार आहे. लढ्याचे राज्यस्तरीय रणशिंग कोल्हापूरात फुंकण्यात येणार आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती लढ्याचे नेतृत्त्व करणार आहेत.
तर मराठा आरक्षणा संदर्भात 5 जूनला पहिला मोर्चा बीडमध्ये निघणारच अशी ठाम भूमिका मराठा नेते आमदार विनायक मेटे यांनी घेतली आहे.खासदार संभाजीराजे सोमवारी कायदेतज्ज्ञांशी चर्चा करुन आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत.
मराठा आरक्षण रद्द झाल्याचा बळी, शैक्षणिक नुकसान झाल्याने तरुणाची आत्महत्या
या बैठकीनंतर संभाजीराजे राज्याचा दौरा करणार आहेत. यानंतर ते पुणे, औरंगाबाद, नाशिक येथे सकल मराठा समाजाच्या पदाधिकाºयांसोबत चर्चा करून पुढील दिशा दर्शविणार आहेत.मराठा आरक्षण संदर्भात मागील सरकारने योग्य कायदा केला नाही.
सध्याच्या सरकारनेही त्याची मांडणी भक्कमपणे केली नसल्याचा आरोप खासदार संभाजीराजे यांनी केला होता. तसेच यावर मार्ग काढण्यासाठी 27 मे रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व विरोधी पक्षनेत्यांना भेटून समाजाची बाजू मांडणार आहेत.
बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी मोर्चाच्या पूर्वतयारीची बैठक झाली. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर बीडमध्ये मराठा समाजाचा संताप व आक्रोश दाखवण्यासाठी 5 जून रोजी पहिला मोर्चा होत आहे.
याबाबत विनायक मेटे म्हणाले की, 5 जूनला सकाळी 10:30 वाजता मोर्चा बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणार असून या मोचार्ला परवानगी मिळो अथवा नाही पण मोर्चा होणारच’
असा निर्णय बैठकीत झाला आहे. या वेळी या मोचार्चे नाव ‘मराठा क्रांती संघर्ष मोर्चा, लढा आरक्षणाचा’ असे असणार आहे कोरोनाचे सर्व नियम पाळून हा मोर्चा निघणार आहे.
मोर्चा यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. जनजागृतीसाठी तीन टप्पे, बीड शहर- तालुका आणि जिल्हा पातळीवर काम सुरू आहे. जिल्ह्यात प्रचार दौरा वैद्यकीय सेवेसह आजपासून सुरू झाला आहे.
यासाठी 9 समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यावेळी मूक मोर्चा नसणार तर संघर्षशील मोर्चा असणार आहे. आमचा आक्रोश मांडणारा मोर्चा, न्याय मागणारा मोर्चा आहे. सर्व पक्षीय, संघटना, या पलीकडे जाऊन मोर्चा निघेल, असे विनायक मेटे म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागण्यांसह इतर महत्त्वाच्या मागणीसाठी मोर्चा निघणार आहे तसंच जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तो पर्यंत निकराचा लढा सुरूच राहील’ असं देखील विनायक मेटे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App