विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी : माहिती अधिकार कार्यकर्ते अखिल गोगोई यांना आमदारकीच्या शपथविधीपूर्वी विधानसभेत सरकारी कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. तसा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.Akhil Gogoi beaten by police
आसाम विधानसभेचे तीन दिवसांचे अधिवेशन शुक्रवारपासून सुरु झाले. कोरोना चाचणीनंतर गोगोई यांना विधानसभेत आणण्यात आले. त्यावेळी त्यांच्याबरोबरील पोलिस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना एकावर एक अशी दोन पीपीई कीट घातली होती.
गोगोई यांनी त्यांना विचारले की, माझी कोरोना चाचणी झाली आहे, पण तुमची झाली आहे का. त्यावेळी कोविड कर्मचाऱ्यांनी त्यांना ढकलून दिले. शिष्टाचारांचा भंग केल्याचे कारण त्यांनी दिले.
गोगोई यांनी तुरुंगात असूनही निवडणूक लढवून विजय मिळविला. त्यामुळे ते चर्चेचा विषय ठरले आहेत. शिवसागर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेले गोगोई म्हणाले की,
एका आमदाराच्या बाबतीत त्यांनी असे वागू नये, मात्र एक गोष्ट नक्की आणि ती म्हणजे माझा आवाज ते दाबू शकणार नाहीत. हा आसामच्या जनतेचा अपमान आहे.दरम्यान, काही नागरिक तसेच विधानसभा कर्मचाऱ्यांनी गोगोई यांच्याबरोबर सेल्फी काढून घेण्यासाठीही गर्दी केली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App