वृत्तसंस्था
पणजी : गोव्यात ३१ मेपर्यंत कर्फ्यू कायम राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली. तसेच कोरोनाची तिसरी लाट आल्यास तोंड देण्यासाठी पंधरा सदस्यीय कृती दलाची नियुक्ती जाहीर केली. Goa Chief Minister Pramod Sawant has announced the extension of curfew up to May 31
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यव्यापी कर्फ्यूची मुदत रविवारी (ता.२३ ) संपुष्टात येत आहे. पण सध्याची स्थिती पाहत ३१ पर्यंत कर्फ्यू कायम ठेवावा, असे ठरल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
कोरोना नियंत्रणात येत आहे. गोमेकॉ रुग्णालयातील ऑक्सीजनचा प्रश्नही सुटला आहे, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.कर्फ्यूवेळी पूर्वीप्रमाणेच सकाळी सात ते दुपारी एक या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App