विशेष प्रतिनिधी
कोलकाता: पश्चिम बंगालच्या एका मंत्र्यासह टीएमसीच्या चार नेत्यांना सीबीआयने अटक केल्याने पश्चिम बंगालमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे. मंत्री आणि नेत्यांना अटक केल्याने संतप्त मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या थेट सीबीआय कार्यालयात धडकल्या,त्यांनी सीबीआय अधिकाऱ्यांना जाब विचारला. तर टीएमसी कार्यकर्त्यांनी राजभवनाला घेराव घातला आहे. या हाय व्होल्टेड ड्राम्यामुळे बंगालमधील राजकारण चांगलंच तापलं आहे. CBI Vs CM: High Voltage Drama in West Bengal; Mamata Banerjee’s gangsterism in CBI office, Trinamool activists bullying outside Raj Bhavan
आज सकाळी परिवहन मंत्री आणि कोलकाता पालिकेचे अध्यक्ष फिरहाद हकीम त्यांच्या घरात छापेमारी केल्यानंतर त्यांना अटक करून सीबीआय आपल्यासोबत घेऊन गेली आहे. यावेळी हकीम यांनी मला नारदा घोटाळ्यात कोणत्याही नोटीशीशिवाय अटक केली जात असल्याचा दावा केला आहे. या घटनेची माहिती मिळताच टीएमसी कार्यकर्त्यांनी हकीम यांच्या घरासमोर गर्दी केली असून सीबीआय विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे.
त्यानंतर सीबीआयची टीम सुब्रत मुखर्जी आणि मदन मित्रा यांना घेऊनही सीबीआय कार्यालयात आली. तसेच भाजपचे एकेकाळचे नेते सोवन चॅटर्जी यांच्या घरीही छापेमारी केल्यानंतर सीबीआयने त्यांना अटक केली आहे. सोवन चॅटर्जी यांनी निवडणुकीपूर्वी टीएमसी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र तिकीट न मिळाल्याने त्यांनी पुन्हा भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. या चारही नेत्यांना नारदा घोटाळ्या प्रकरणी काही प्रश्न विचारण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना ताब्यात घेतलं आहे. या चारही नेत्यांनी सीबीआयने आपल्याला अटक केल्याचा दावा केला आहे. तर सीबीआयने आम्ही या नेत्यांना अटक केली नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
मुख्यमंत्री सीबीआय कार्यालयात
मंत्री, आमदारांच्या अटकेनंतर ममता बॅनर्जी यांनी थेट सीबीआयलाच आव्हान दिलं आहे. हिंमत असेल तर मलाही अटक करून दाखवा, असं आव्हानच ममता बॅनर्जी यांनी दिलं आहे. टीएमसीचे नेते आणि मंत्र्यांना बेकायदेशीरपणे अटक करण्यात आले आहे. त्यामुळे मलाही अटक करा, असं त्या म्हणाल्या आहेत. नेत्यांच्या अटकेनंतर ममता बॅनर्जी या सीबीआय कार्यालय असलेल्या निजाम पॅलेसमध्ये पोहोचल्या .
टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी सीबीआय कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याने जमावाला पांगवण्यासाठी केंद्रीय वाहिनीच्या जवानांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. या जवानांनी टीएमसी कार्यकर्त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या जवानांना धक्काबुक्की केली. त्यामुळे तणाव अधिकच वाढला या परिसरात पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
राजभवनाला घेराव
इकडे ममता बॅनर्जी या सीबीआय कार्यालयात दाखल झालेल्या असतानाच नारदा प्रकरणी राज्यपाल जगदीप धनखड यांनी खटला भरण्याची परवानगी दिल्याच्या निषेधार्थ टीएमसी कार्यकर्त्यांनी राजभवनला घेराव घातला . राजभवनाच्या नॉर्थ आणि साऊथ गेटवर उभं राहून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली .
CBI Vs CM: High Voltage Drama in West Bengal; Mamata Banerjee’s gangsterism in CBI office, Trinamool activists bullying outside Raj Bhavan
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App