Cyclone Tauktae Photos : अरबी समुद्रातील चक्रीवादळ तौकते (Tauktae) हवामान विभागाच्या मते, अत्यंत गंभीर चक्रवादळात रूपांतरित झाले आहे. हे वादळ आज संध्याकाळी गुजरातच्या किनाऱ्याजवळ पोहोचण्याची शक्यता आहे. उद्या 18 मे रोजी सकाळी हे वादळ भावनगरच्या महुवा आणि पोरबंदरवरून जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तौकते रविवारी सकाळी गोवा (Goa)च्या समुद्रकिनाऱ्याजवळ होते. गोव्यात या वादळामुळे मोठा विध्वंस झाल्यानंतर ते महाराष्ट्राकडे सरकले. यामुळे खबरदारी म्हणून वांद्रे-वरळी सी-लिंक बंद केले आहे. Cyclone Tauktae Photos From Kerala Goa Mumbai Maharashtra Latest News
वृत्तसंस्था
मुंबई : अरबी समुद्रातील चक्रीवादळ तौकते (Tauktae) हवामान विभागाच्या मते, अत्यंत गंभीर चक्रवादळात रूपांतरित झाले आहे. हे वादळ आज संध्याकाळी गुजरातच्या किनाऱ्याजवळ पोहोचण्याची शक्यता आहे. उद्या 18 मे रोजी सकाळी हे वादळ भावनगरच्या महुवा आणि पोरबंदरवरून जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तौकते रविवारी सकाळी गोवा (Goa)च्या समुद्रकिनाऱ्याजवळ होते. गोव्यात या वादळामुळे मोठा विध्वंस झाल्यानंतर ते महाराष्ट्राकडे सरकले. यामुळे खबरदारी म्हणून वांद्रे-वरळी सी-लिंक बंद केले आहे. दुसरीकडे, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश आणि तमिलनाडूसहित सभी किनारपट्टीवरील राज्यांतही याचा प्रभाव जाणवला. (सर्व फोटो ANI वरून साभार.)
तिरुवनंतपुरममध्येही वादळाचा परिणाम असा पाहायला मिळाला.
केरळमध्येही वादळाचा तडाखा बसला. लोकांना वेळेवर मदत पोहोचवून बचाव कार्य करण्यात आले.
बीएमसीने वांदे-वरळी सी-लिंक बंद केली आहे.
उपग्रहाच्या छायाचित्रांमध्ये तीव्र चक्रीवादळाचे संकेत मिळाले होते. यावरून सरकार राज्यांना अलर्ट करून बचावाच्या उपाययोजना राबवल्या. सॅटेलाइट इमेजनुसार, तौकते चक्रीवादळ महाराष्ट्रापासून पुढे सरकल्यानंतर अंदाजे 70-80 किमीचा वेग धारण करू शकते.
हैदराबादेतील हा फोटो वादळाचा प्रभाव स्पष्टपणे दाखवतो.
तामिळनाडूच्या कन्याकुमारीचे मंदिर पूर्ण जगात प्रसिद्ध आहे. येथे समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या लोकांची घरे उद्ध्वस्त झाले. पोलीस आणि प्रशासनाने लोकांची शक्य ती सर्व मदत केली.
कर्नाटकात पर्यटन स्थळांचेही नुकसान झाले. तथापि, एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणांवरून लोकांना वेळेवर सुरक्षित ठिकाणी हलवले.
कर्नाटकातीलच वादळाचा प्रभाव दाखवणारा हा फोटो.
वादळामुळे लोकांची घरे पाण्यात बुडाली. केरळ, कर्नाटक आणि गोव्याच्या किनारी भागात रविवारी विध्वंस केल्यानंतर चक्रीवादळ तौकते (Cyclone Tauktae) उत्तरेत गुजरातकडे सरकले.
अरबी समुद्रात चक्रीवादळ तौकते (Tauktae)मुळे अनेक राज्यांत अलर्ट जारी करण्यात आला आहे. कर्नाटकात वादळामुळे झालेल्या मुसळधार पावसात 4 जणांचा मृत्यू झाला आणि राज्यात एकूण 73 गावे यामुळे प्रभावीत झाली.
महाराष्ट्रातही वादळामुळे मोठे नुकसान झाले. मुंबईत अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. वीज गेली. अनेक वाहनांचेही नुकसान झाले. तौकते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागातील 12420 लोकांना काढण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. तर रायगड जिल्ह्यात मात्र रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
वादळामुळे किनारपट्टीवरील राज्यांत मोठे नुकसान झाले. वीजकेंद्रांवर परिणाम झाल्याने बराच काळ वीज गेलेली होती. फोटोंमधून विध्वंसाचा अंदाज येतो.
वादळाच्या वाटेत आलेले जहाज.
चक्रीवादळ गोव्याच्या किनारपट्टीला धडकले, तर पणजीसहित पूर्ण राज्यात याचा परिणाम दिसून आला. गोव्यात चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
Cyclone Tauktae Photos From Kerala Goa Mumbai Maharashtra Latest News
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App