मृत्यूनंतर शत्रूकडूनही वाईट बोलले जात नाही. मात्र, एका पत्रकाराने आणि राजकीय कार्यकर्त्याने असंवेदनशिलतेने भाजपाच्या मणीपूरमधील प्रदेशाध्याच्या मृत्यूनंतर त्यांची खिल्ली उडविली. याप्रकरणी दोघांनाही अटक करण्यता आली आहे.
प्रतिनिधी
इंफाळ : मृत्यूनंतर शत्रूकडूनही वाईट बोलले जात नाही. मात्र, एका पत्रकाराने आणि राजकीय कार्यकर्त्याने असंवेदनशिलतेने भाजपाच्या मणीपूरमधील प्रदेशाध्याच्या मृत्यूनंतर त्यांची खिल्ली उडविली. याप्रकरणी दोघांनाही अटक करण्यता आली आहे. BJP leader mocked after death
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सैखोम टिकेंद्र सिंह यांचा नुकताच कोरोनामुळे मृत्यू झाला. यावर पत्रकार किशोरचंद्र वांगखेम आणि राजकीय कार्यकर्ते एरेंड्रो लिचोम्बम यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. यामध्ये म्हटले की कोरोनावर गोबर आणि गोमूत्र उपयुक्त ठरत नाहीत. त्यांनी ही पोस्ट केल्यावर मणीपूरमध्ये संतापाची लाट उसळली.
अनेकांनी त्यांचा निषेध केला. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष उषाम देबन आणि महासचिव पी. प्रेमानंद मितेई यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलीसांनी दोघांनाही अटक केली. न्यायालयाने या दोघांनाही १७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पत्रकार वांगखेम यांच्यावर याआधीही दोन वेगवेगळ्या प्रकरणात दोनवेळा अटक झाली होती. मणिपूरमधील भाजपाशासित सरकारने त्यांच्याविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) अंतर्गत देशद्रोहाचा आरोप केला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App