विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) माजी फिरकीपटू रमेश पोवारची महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक केली आहे. बीसीसीआयने या पदासाठी अर्ज मागवले होते आणि ३५ हून अधिक जणांनी या पदासाठी आपले नाव दिले होते.Ramesh Powar appointed Head Coach of Indian Womens Cricket team
बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
NEWS: Ramesh Powar appointed Head Coach of Indian Women’s Cricket team Details 👉 https://t.co/GByGFicBsX pic.twitter.com/wJsTZrFrWF — BCCI Women (@BCCIWomen) May 13, 2021
NEWS: Ramesh Powar appointed Head Coach of Indian Women’s Cricket team
Details 👉 https://t.co/GByGFicBsX pic.twitter.com/wJsTZrFrWF
— BCCI Women (@BCCIWomen) May 13, 2021
पोवार यांनी अनेक दिग्गजांना पछाडत बाजी मारली आहे. पोवार डब्ल्यूव्ही रमन यांची जागा घेणार आहेत. बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठी १३ एप्रिलला जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी अर्ज दाखल केले होते. मात्र सर्व प्रक्रियेनंतर पोवार सरस ठरले आहेत.
एकूण ३५ अर्ज
महिल्या संघाच्या प्रशिक्षकपदासाठी एकूण ३५ जणांनी अर्ज केले होते. त्यातून ८ जणांची निवड करण्यात आली होती. यामध्ये डबल्यू व्ही रमन, रमेश पोवार, ऋषिकेश कानिटकर, अजय रात्रा, सुमन शर्मा, ममाथा माबेन, हेमलता काला आणि देविका वैद्य यांचा समावेश होता. या ८ जणांची मुलाखत ही (Cricket Advisory Committee) बीसीसीआयच्या सल्लागार समितीने घेतली. या समितीमध्ये मदन लाल, सुलक्षणा नाईक आणि आरपी सिंगचा समावेश होतेा. मात्र या ८ जणांना पोवार पुरुन उरले. अखेर सल्लागार समितीने पोवार यांची प्रशिक्षक पदासाठी नाव अंतिम केलं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App