वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारत बायोटेकची कोवॅक्सिन या स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लसीची 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणीसाठी शिफारस केली आहे. दुसऱ्या/तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी ही शिफारस केली आहे. Bharat Biotech’s COVID-19 vaccine Covaxin recommended by expert panel for phase II/III clinical trials on 2 to 18 year-olds
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोना होत असल्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी भारत बायोटेकने केली होती.
त्याला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (सीडीएससीओच्या ) कोविड-19 विषयक तज्ज्ञ समितीने मंगळवारी (11 मे) मंगळवारी चाचणी करण्यास हरकत नसल्याची ही शिफारस केली.
ही चाचणी नागपूरमधील मेडिट्रिना मेडिकल सायन्स इन्स्टिट्यूट, दिल्ली तसंच पाटण्यातील एम्ससह विविध ठिकाणी केली जाईल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App