विशेष प्रतिनिधी
मुंबई: अरबी समुद्रात येत्या आठवड्यात चक्रीवादळ धडकणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पश्चिम किनारपट्टीवरील प्रमुख राज्य महाराष्ट्र , केरळ, गुजरातला सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. म्यानमारने चक्रीवादळाला तौक्ते असं नाव दिलं आहे. New Cyclone tauktae coming towards Arabian Sea from Myanmar high alert issue for Maharashtra Gujarat and Kerala
Cyclone tauktae is expect to form south of Lakshadweep and move north, coming very near and grazing the coast of Kerala. So very heavy to Extreme rains will commence over Kerala and Karnataka coasts from 14th -15th May #Tauktae #Kerala pic.twitter.com/4Y58Xxq741 — West Coast Weatherman (@RainTracker) May 11, 2021
Cyclone tauktae is expect to form south of Lakshadweep and move north, coming very near and grazing the coast of Kerala. So very heavy to Extreme rains will commence over Kerala and Karnataka coasts from 14th -15th May #Tauktae #Kerala pic.twitter.com/4Y58Xxq741
— West Coast Weatherman (@RainTracker) May 11, 2021
अरबी समुद्रात येत्या आठवड्यात चक्रीवादळ धडकणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. त्या चक्रीवादळाला म्यानमारने टाँकटाइ असं नाव दिलं आहे. केरळ, गुजरात, महाराष्ट्राच्या किनारपट्टीला सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. गुजरात किनारपट्टीला वादळाकडून नुकसान पोहचण्याची शक्यता आहे.
द.अरबी समुद्रात १५ मे च्या आसपास चक्रीवादळाची शक्यता. उ.उ पच्छिम सरकण्याची शक्यता. १४ मे रात्री पासुन केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, महाराष्ट्र-गोवा किनार पट्टी च्या भागांना सतर्कतेचा इशारा. मच्छिमारांना व बोटींना परतण्यासाठी इशारे– IMD @CMOMaharashtra @DisasterState — K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 11, 2021
द.अरबी समुद्रात १५ मे च्या आसपास चक्रीवादळाची शक्यता. उ.उ पच्छिम सरकण्याची शक्यता. १४ मे रात्री पासुन केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, महाराष्ट्र-गोवा किनार पट्टी च्या भागांना सतर्कतेचा इशारा. मच्छिमारांना व बोटींना परतण्यासाठी इशारे– IMD @CMOMaharashtra @DisasterState
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 11, 2021
भारत हवामानशास्त्र विभागाचे (आयएमडी) महासंचालक एम. महापात्र यांनी सांगितले की, ‘आतापर्यंत हे चक्रीवादळ अरबी समुद्रापासून वायव्य दिशेने प्रगती करीत आहे. चक्रवादळ मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे महापात्र म्हणाले की, चक्रीवादळ कोणत्या मार्गाने प्रवास करील याची माहिती लवकर मिळेल. या वादळावर आयएमडी बारीक लक्ष ठेवून आहे आणि त्यानुसार निर्देश जारी करेल.
म्यानमारकडून वादळाची आगेकूच
म्यानमारकडून वादळाची आगेकूच सुरु असून पुढील काही दिवसांमध्ये अरबी समुद्रासह पश्चिम किनारपट्टीवरील राज्य महाराष्ट्र, केरळ, गुजरात आणि कर्नाटकमध्ये देखील पाऊस होण्याचा अदांज आहे. tauktae या वादळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
2021 मधील पहिलं चक्रीवादळ
महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टीवरील राज्यांना 2020 मध्ये निसर्ग चक्रीवादळाचा सामना करावा लागला होता. निसर्ग चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या कोकणातील जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालं होतं. निसर्ग चक्रीवादळानंतर मोठ्या स्वरुपातील तौक्ते हे चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. चक्रीवादळामुळं कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन पश्चिम किनारपट्टीवरील राज्यांमध्ये पाऊस होऊ, शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App