जगभरातले अनेक देश चिनी विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना बेजार झाले आहेत. गेले दीड वर्ष जगभर धुमाकूळ घालणारा हा विषाणू स्वतःला वेगाने बदलत असून त्याचे वेगवेगळ्या देशात भिन्न स्ट्रेन आढळत आहेत. भारतातदेखील चिनी विषाणूचे सुमारे 190 स्ट्रेन आढळून आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच उपलब्ध झालेली लस चिनी विषाणूच्या या विविध रुपांवर कार्यक्षम ठरेल का अशी शंका व्यक्त केली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी या संदर्भात महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. No matter how many changes Cvid-19 may take, the vaccine is effective on every mutant variant, Explains WHO chief scientist Soumya Swaminathan
वृत्तसंस्था
जिनिव्हा : कोविड-19 अर्थात चिनी विषाणूने कितीही रुपे बदलली, डबल म्युटंट झाला तरी सध्या उपलब्ध असलेल्या सर्व लसी त्याचा मुकाबला करण्यास सक्षम आहेत.
चिनी विषाणूचे विविध स्ट्रेन लसींचा प्रतिरोध करत असल्याचे दाखवणारी आकडेवारी उपलब्ध नाही, असे प्रतिपादन जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी केले.
सोमवारी (10 मे) त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. विशेष म्हणजे भारतीय प्रसारमाध्यमांमधल्याच काही घटकांनी या संदर्भात शंका उपस्थित केली होती.
भारतात लसीकरणा कार्यक्रम जोरात चालू असला तरी दिल्या जाणाऱ्या लसी डबल म्युटंट चिनी विषाणूवर परिणामकारक नसल्याची चिंता या काही महाभागांनी व्यक्त केली होती. मात्र त्यास कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचे स्वामीनाथन यांच्या प्रतिपादनामुळे स्पष्ट झाले आहे.
सीएनबीसी टीव्ही-18 या वृत्तवाहिनीशी बोलताना स्वामीनाथन म्हणाल्या की, कोरोना विषाणूवर सध्या आलेल्या लसींमुळे मिळणारी प्रतिकारक्षमता त्याचा मुकाबला करण्यास सक्षम आहेत.
लसींच्या परिणामकारकतेवर शंका घेण्याइतपत कोणताही डाटा नाही. सर्व उपलब्ध लसी कोरोना संसर्गाची तीव्रता कमी करतात. लस घेतल्यानंतरही कोरोना विषाणूची लागण झाली तरी त्याचा संसर्ग सौम्य असतो.
भारतामध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या विविध स्ट्रेनचे विषाणू हे अधिक संसर्गजन्य असल्याचे दिसते. त्यामुळे अधिक संक्रमण होते. या बद्दल स्वामीनाथन म्हणाल्या की या संदर्भातही डब्ल्यूएचओकडे आकडेवारी नाही.
ती मिळवण्याची आम्हाला भारताकडूनच अपेक्षा आहे. भारतात उद्भवलेल्या संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा शेवट कधी होईल या बद्दल त्यांनी भाष्य केले नाही. काही राज्यांमध्ये आता ही लाट ओसरत असल्याचे दिसते. मात्र काही राज्यांमध्ये दुसरी लाट अद्याप दिसलेली नाही तिथे संसर्ग वाढण्याची शक्यता स्वामीनाथन यांनी व्यक्त केली.
कोरोना लसींवरील पेटंट माफ करण्याची मागणी भारताने केली आहे. त्याचे समर्थन करताना स्वामीनाथन म्हणाल्या की, “पेटंट संबंधित निर्बंध उठविणे महत्वाचे आहे. ही पहिली पायरी आहे,
परंतु निश्चितपणे पुरेसे नाही. साध्या औषधांच्या तुलनेत लस तयार करणे जटिल आणि कठीण आहे.” त्यामुळे लसींचा जलद आणि पुरेसा पुरवठा होण्यासाठी तंत्रज्ञानाचे हस्तांतरण तितकेच महत्त्वपूर्ण आहे,
असे सांगून त्या पुढे म्हणाल्या की,”लस तयार होण्यास बराच कालावधी लागतो. म्हणूनच पेटंट माफ करण्याव्यतिरिक्त आम्हाला तंत्रज्ञान हस्तांतरण देखील आवश्यक आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App