विशेष प्रतिनिधी
जेरुसलेम – ओल्ड सिटी येथील अल -अक्सा मशिदीत इस्रायली पोलिस आणि पॅलेस्टिनी मुस्लिमांमध्ये झालेल्या संघर्षात ५३ जण जखमी झाले. येथील जागेच्या हक्कावरून इस्राईल आणि पॅलेस्टाईनमध्ये गेल्या आठवड्यापासून तणाव निर्माण झाला आहे. अल-अक्सा मशिदीत शुक्रवारी मुस्लिम नमाज पठण करीत असताना तेथे इस्रायली पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. 53 police injured in clashes in Israel
यामुळे हा संघर्ष उफाळून आला. संतप्त पॅलेस्टिनी मुस्लिम पोलिसांवर खुर्च्या, बूट, दगड फेकून मारत असल्याचे व्हिडिओ चित्रणात दिसले आहे. त्याला प्रत्युत्तर देताना पोलिसांनी गोळीबार केला. तसेच मशिदीचे सर्व दरवाजेही बंद केले.
जेरुसलेम हे शहर नेहमी धुमसत असते. मात्र गेल्या काही वर्षांत ते तुलनेने तसे शांत होते. त्यामुळ सर्वसामान्य नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. आता आता पुन्हा संघर्ष सुरु झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण जेरुसलेममधील संघर्षाच्या ठिणगीचे कधी वणव्यात रुपांतर होईळ आणि साऱ्या आखाती देशांत ते पसरेल याचा कधीच नेम नसतो. त्यामुळे या तणावाकडे जगाचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App