विशेष प्रतिनिधी
कडप्पा : आंध्र प्रदेशातील चुनखडीच्या खाणीत झालेल्या स्फोटात दहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण अडकले आहेत. स्फोटामागचे नेमके कारण समजू शकले नाही. Ten people died in blast
चुनखडीच्या खाणीत कामगार नेहमीप्रमाणे दगड फोडण्याचे काम करत असताना अचानक मोठा स्फोट झाला. त्यात दहा जण जागीच ठार झाले तर ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याचे सांगितले जात आहे. ग्रेनाईडमध्ये ड्रिलिंग करत असताना स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनास्थळी मोठ्या प्रमाणात जिलेटीनच्या कांड्या असल्याने त्याची तीव्रता खूप होती. खाणीतील स्फोटाचा आवाज ऐकून गावातील लोक घराबाहेर आले. खाणीतून मोठा धूर बाहेर पडताना पाहिला. या घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस आणि बचाव पथकाने जखमींना ढिगाऱ्याबाहेर काढून त्यांना दवाखान्यात नेण्यात आले.
जिल्हा प्रशासनाचे अधिकारी खाणीतील स्फोटाची चौकशी करत आहेत. चुनखडीच्या खाणीत आणखी काही कामगार असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मामिलपल्ली गावाजवळील अनेक खाणीत विनापरवाना उत्खनन करण्यात येते, परंतु संबंधित खाणीत उत्खननाला परवानगी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App