वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर उफाळून आलेल्या हिंसाचाराचा आणि हिंदूवर केलेल्या अत्याचाराचा जगभरातून निषेध केला जात आहेत. 30 देशांत राहणाऱ्या अनिवासी भारतीयांनी या अत्याचाराचा निषेध मोर्चे काढून केला. त्यामुळे पश्चिम बंगालमधील धर्मांध मुस्लिमांची जगभर छी थू झाली आहे. तसेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या धर्मनिरपेक्षतेचा बुरखा टराटरा फाडला गेला आहे. ‘Hindu Lives Matter’, ‘Hindu genocide’, ‘Mamata Stop Hindu Killing, Stop Raping Hindus’
निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले केले. परंतु विजय झाल्यावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बुरख्या आड असलेल्या धर्मांध मुसलमांनानी हिंदूंना लक्ष्य केले. महिलांचा विनयभंग आणि बलात्कार केल्याच्या घटना घडल्या आहेत. मुस्लिम बहुसंख्य असलेल्या भागात हा हिंसाचार केला आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात हिंदूंना लक्ष करून त्यांच्यावर हल्ले करण्यात आले.
मातेच्या पायाखाली स्वर्ग अशी शिकवण देणाऱ्या धर्माच्या अनुयायांकडून महिलांवर अत्याचार केले गेले, हे कोणत्या धर्मात बसते, असा सवाल आता जगभर विचारला जात आहे. अन्यायाला जगभरात वाचा फोडण्यात आल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या धर्मनिरपेक्षतेचा बुरखा टराटरा फाटला गेले आहेत. दरम्यान, हिंसाचाराला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी ,अशी मागणी भाजपचे राज्य प्रमुख अमित मालवीय यांनी केली आहे. त्यांनी जगभरात झालेल्या निषेध मोर्चाची छायाचित्र ट्विटरवर शेअर केली असून त्यावेळची पोस्टरवरील मजकूरही शेअर केला आहे. पोस्टरवर लिहिले होते.
दोषींवर कारवाई कधी होणार ?
राज्यात हिंदूंवर आलेल्या अत्याचाराची माहिती भाजप नेते कैलाश विजयवर्गीया यांनी भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना दिली. त्याबाबतचा सर्व तपशील गोळा करा, असा सल्ला त्यांनी दिला असून दोषींवर सरकार कारवाई करेल, असे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App