वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पाच राज्यातील निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. त्यात पुडूचेरीत भाजपची राजवट आली आहे. त्यामुळे भारताच्या राजकीय नकाशात भाजप आणि एनडीए आघाडीचा फायदा झाला आहे त्यामुळे भाजप शासित राज्यांची संख्या आता 18 होणार आहे.BJP’s dominance in the political map of the country,
यापूर्वी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बिहार निवडणुकीनंतर 49 टक्के लोकसंख्या आणि 52 टक्के क्षेत्र असलेल्या 17 राज्यात भाजपची सत्ता होती. त्या तुलनेत पुडूचेरी हा छोटा प्रदेश आहे. केवळ 14 लाख लोकसंख्या आणि 483 चौरस किलोमीटरचा हा भूभाग आहे.
2018 मध्ये भाजपप्रणित एनडीएचे 21 राज्यात सरकार होते.71 टक्के लोकसंख्या आणि 80 टक्के क्षेत्रावर भाजप सत्तेवर होते. याची तुलना इंदिरा गांधी यांच्या काळखंडाशी केली जात आहे. कारण त्यावेळी अनेक राज्यात काँग्रेसची राजवट होती.
विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा एनडीएची तुलना इंदिरा गांधी यांच्या राजवटीशी केली होती. 2017 मध्ये गुजरात आणि हिमाचल प्रदेश भाजपने जिंकला तेव्हा मोदी यांनी संसदीय दलाच्या बैठकीत मोठ्या गर्वाने सांगितले होते की, इंदिरा गांधी
सत्तेवर असताना 18 राज्यात काँग्रेसची सत्ता होती. ( वास्तविक 17 राज्यात काँग्रेस सत्तेवर होती), पण, आम्ही सत्तेवर आलो जेव्हा भाजप 19 राज्यात सत्तेवर आला आहे.
विशेष बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App